अभिनेत्री नीना गुप्ता यांनी दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डेंचे मानले आभार, 'Kolhapuri chappal' विषयी अभिमानास्पद भाष्य VIDEO
Neena Gupta on Laxmikant Berde : अभिनेत्री नीना गुप्ता हिने दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे आभार मानले आहेत. तिने यावेळी कोल्हापुरी चप्पलबाबत देखील अभिमानास्पद भाष्य केलंय.

Neena Gupta on Laxmikant Berde : इटलीतील फॅशन कंपनी प्राडाने मिलानमधील फोंडाजियोन डिपोसिटोमध्ये मेलस स्प्रिंग/समर 2026 कलेक्शन सादर केले होते. या कलेक्शनमध्ये कंपनीने एक चप्पल सादर केली, जी भारतातील कोल्हापुरी चप्पलांशी खूप साधर्म्य असलेली होती. कोल्हापुरी चप्पलांची नक्कल किंवा साम्य असल्यामुळे प्राडावर टीका सुरु झाली. मात्र, त्यानंतर प्राडाने हे मान्य केले आहे की त्यांचा फुटवेअर डिझाइन परंपरागत कोल्हापुरी सँडल्सपासून प्रेरित आहे. दरम्यान, यावर आता बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता हिने देखील भाष्य केलं असून तिने यावेळी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे आभार मानले आहेत.
नीना गुप्ता म्हणाल्या, लक्ष्मीकांत तुम्ही आमच्यामध्ये नाहीत. पण तुमचे खूप खूप आभार मानते. सध्या मी घातलेली कोल्हापुरी चप्पल खूप चर्चेत आहे. मी एकदा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत मी काहीतरी इव्हेंट केला होता. माझ्या आता लक्षात नाही. तेव्हा मी त्यांना म्हणाले होते की, मला तुम्ही कोल्हापूरवरुन ही चप्पल आणून देऊ शकता का? त्यांनी म्हटले हो... आणि मला त्यांनी ही चप्पल आणून दिली. माझ्याकडे आत्तापर्यंत असलेल्या चप्पलांपैकी ही सर्वांत सुंदर चप्पल आहे. ही चप्पल सर्वांत सुंदर आहे, आणि हाताने बनवलेली आहे. लक्ष्मीकांत तुमचे खूप खूप आभार..
View this post on Instagram
कोल्हापुरी चप्पलबाबत करीना कपूरकडून देखील भाष्य
अभिनेत्री करीना कपूर खानने तिच्या इंस्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बीचवर आराम करताना दिसते. या फोटोमध्ये तिच्या पायात सुंदर कोल्हापुरी चप्पल दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना करिनाने लिहिले, “सॉरी, प्राडा नाही… कोल्हापुरी.” करिनाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, कोल्हापुरी चप्पलीचं सध्या देशाभरात कौतुक होत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीयांच्या फॅशनचं कौतुक केलं जात आहे. प्राडाने ही चप्पल भारतीय लोकांकडून प्रेरीत असल्याचं कबुल केलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मराठीच्या नावावर हिंदू लोकांना मारणं चुकीचं, हिंदुस्तानी भाऊचा राज ठाकरेंवर शाब्दिक हल्ला! VIDEO
























