मराठीच्या नावावर हिंदू लोकांना मारणं चुकीचं, हिंदुस्तानी भाऊचा राज ठाकरेंवर शाब्दिक हल्ला! VIDEO
Hindustani Bhau on Raj Thackeray : मराठी-हिंदी वादावरुन हिंदुस्तानी भाऊ म्हणजे विकास पाठक याने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे.

Hindustani Bhau on Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठीविरुद्ध हिंदी असा वाद भडकलेला पाहायला मिळतोय. महाराष्ट्रात आल्यानंतर मराठी शिकली जावी, असा आग्रह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून धरला जातोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहानाला उत्तर भारतीय नेत्यांकडून आव्हान दिलं जातंय. विशेष म्हणजे मराठी बोलता येणारा कलाकार विकास पाठक याने देखील यावेळी हिंदी भाषिकांची बाजू घेतली आहे. हिंदूस्तानी भाऊ म्हणजे विकास पाठक याने हिंदी भाषिकांची बाजू घेताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर भूमिका मांडणारा व्हिडीओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
हिंदूस्तानी भाऊ म्हणजेच विकास पाठक म्हणाला, जय महाराष्ट्र... हा जय महाराष्ट्र आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना.. साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावननगरीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा गर्वच नाही तर माज आहे, असं बोललं जातंय. मराठी असल्याचा गर्वच नाही तर माज आहे. पण साहेब मराठीच्या नावावर इथे आलेल्या हिंदुस्तानातील लोकांना, आपल्या हिंदू लोकांना मारणे चुकीचं आहे.
पुढे बोलताना हिंदुस्तानी भाऊ म्हणाला, शाळेत असो किंवा कॉलेजमध्ये मराठी भाषा शिकवलीच पाहिजे. ज्यासाठी जेवढी ताकद लावायची आहे, तेवढी लावा.. पूर्ण हिंदू समाज तुमच्याबरोबर आहे. गोरगरिबांना मारणे चुकीचं आहे. कारण ते आज इथे नोकरी करण्यासाठी आले आहेत. महाराष्ट्रातील अनेक लोकं देखील वेगवेगळ्या राज्यांमध्ये शिकायला गेली आहेत. काम करायला गेली आहेत. तेथील लोकं हे सगळं पाहात आहेत की आपल्या लोकांना मारलं जातंय. त्या लोकांनी तिथे आपल्या मराठी माणसांबरोबर असं केलं. तुम्ही इथं आलात तर तुम्हाला मराठी बोलावं लागेल.. तेव्हा आपण काय करणार? कोणाला मारणं खूप सोपं असतं. पण एकत्र आणणे खूप अवघड असते. हिंदूत्वाला एकत्र आणा साहेब... बाळासाहेबांची सावली राजसाहेबांमध्ये पाहिली जाते. इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो..असं ऐकल्यावर अंगावर काटा येतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या























