Bollywood Actor Life Story: वडिलांनी घराबाहेर काढलं, रेल्वे स्टेशनवर झोपून रात्र काढली, कास्टिंग काऊचचाही सामना केला अन् एक दिवस टेलिव्हिजनचा शाहरुख खान बनला; ओळखलं का कोण?
Bollywood Actor Life Story: आम्ही ज्या अभिनेत्याबाबत सांगत आहोत, त्याचं नाव राजीव खंडेलवाल. यानं टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आणि 'क्या हादसा क्या हकीकत', 'कहीं तो होगा' आणि 'लेफ्ट राईट लेफ्ट' यांसारखे हिट शो दिले.

Bollywood Actor Life Story: वरचा फोटो तुम्ही पाहिलाय का? या फोटोमध्ये डावीकडून दुसरा मुलगा दिसतोय? त्याला ओळखता का तुम्ही? हा मुलगा साधासुधा कुणी नसून टेलिव्हिजनच्या जगतातील शाहरुख खान आहे. हा चिमुकला मुलगा मोठा होऊन ज्यावेळी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत आला, त्यावेळी त्यानं खळबळ उडवून दिलेली. त्याच्या येण्यानं भल्याभल्या टेलिव्हिजन स्टार्सची भंबेरी उडालेली. काही वेळातच तो टेलिव्हिजनचा सुपरस्टार (Television Superstar) म्हणून ओळखला जाऊ लागला. सलग दोन हिट शो दिल्यामुळे त्याला 'टीव्हीचा शाहरुख खान' म्हटलं जाऊ लागलं. पण, कधीकाळी त्याला अभिनेता व्हायचं होतं, म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला घराबाहेर हाकलवून दिलेलं. त्याच्या आयुष्यातला एक काळ असा होता की, त्यावेळी त्यानं चक्क रेल्वे स्टेशनवर झोपून रात्र काढली होती.
आम्ही ज्या अभिनेत्याबाबत सांगत आहोत, त्याचं नाव राजीव खंडेलवाल (Rajeev Khandelwal). यानं टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आणि 'क्या हादसा क्या हकीकत', 'कहीं तो होगा' आणि 'लेफ्ट राईट लेफ्ट' यांसारखे हिट शो दिले. टेलिव्हिजन इंडस्ट्रीत राजीव खंडेलवालनं आपला काळ गाजवला. टेलिव्हिजनचा सुपरस्टार असूनही मोठ्या पडद्यावर मात्र त्याची जादू फारशी चालली नाही. राजीवनं चित्रपटांमध्येही काम केलं, पण तो जेवढा छोट्या पडद्यावर यशस्वी झाला, तेवढा तो मोठ्या पडद्यावर फारसा यशस्वी होऊ शकला नाही. टीव्हीच्या जगात त्याला जे स्टारडम मिळालं होतं, ते बॉलिवूडमध्ये त्याला मिळू शकलं नाही. वर दिलेला राजीवच्या लहानपणीचा फोटो त्यानंच त्याच्या फेसबुक अकाउंटवर 2011 मध्ये शेअर केला होता.
अभिनेता बनण्याचं स्वप्न पाहिलं, वडिलांनी घराबाहेर हाकलून दिलं
राजीव खंडेलवाल एक आऊटसायडर आहे, ज्याचा कोणताही फिल्मी बॅकग्राउंड नव्हता. तरीही त्याने शोबिझ इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळक निर्माण केली. राजीवचे वडील लेफ्टनंट सीएल खंडेलवाल सैन्यदलात होते. सध्या ते निवृत्त झाले आहेत. आता राजीवच्या पाठीशी त्याचे वडील खंबीरपणे उभे असले तरीसुद्धा एक वेळ होती, जेव्हा त्याच्या वडिलांना राजीवचं अभिनेता बनण्याचं स्वप्न अजिबात आवडत नव्हतं. तेव्हा त्यांनी त्याला घराबाहेर हाकलून दिलेलं.
झूमला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राजीव खंडेलवालनं सांगितलेलं की, "मला घराबाहेर हाकलून लावण्यात आलेले. माझ्या आईवडिलांनी सांगितलं की, त्यांना ही इंडस्ट्री काय आहे, हे समजत नाही. त्यांना माहीत होतं की, माझ्यात माझे जीवन सभ्यपणे जगण्याची क्षमता आहे, परंतु त्यांना आश्चर्य वाटलं की, माझ्या डोक्यात अभिनयाचं भूत नेमकं आलं कुठून?"
Instagram पर यह पोस्ट देखें
राजीव खंडेलवालला त्याचे वडील काय म्हणालेले?
राजीव खंडेलवाल यांच्या मते, त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलेलं की, जे काही करायचंय ते कर आणि पैसे कमव. याचा अर्थ स्पष्ट होता की, तू इथेच राहून इतर मुले जे करतात ते कर. जर तुला रोमँटिक हिरो बनायचे असेल, जर तुला अभिनय करायचा असेल, तर माझ्याकडे तुझ्यासाठी पैसे नाहीत. मला आणखी दोन मुलं आहेत.
टेलिव्हिजनचा सुपरस्टार असूनही आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव
राजीव खंडेलवाललाही त्याच्या कारकिर्दीत कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. ज्याबद्दल त्यानं अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला. राजीव म्हणाला की, "जेव्हा हे घडलं तेव्हा मी त्या माणसाला थेट सांगितलं, 'माफ करा साहेब, तुम्ही मला भेटणार नाही.' मी विचार करत होतो की, हा तो माणूस आहे का? जो माझं नशीब ठरवणार आहे? नाही. मी माझं नशीब स्वतः लिहितो. मी कधीही कोणालाही माझं आयुष्य घडवण्याची किंवा खराब करण्याची शक्ती दिलेली नाही."
राजीव खंडेलवालच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, चित्रपटांमध्ये फ्लॉप झाल्यानंतर, त्यानं ओटीटीच्या जगात प्रवेश केला आणि तो चांगली कामगिरी करत आहे. 2024 मध्ये तो 'शोटाइम' या मालिकेत दिसला, तर यावर्षी तो ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होणाऱ्या 'द सीक्रेट ऑफ द शिलेदार्स'मध्ये दिसलेला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























