Jaideep Ahlawat Buys Property In Mumbai: अभिनेत्याला लागली कोट्यवधींची लॉटरी? महिन्याभरातच मुंबईत खरेदी केली 2 आलिशान घरं; एक पत्नीच्या नावावर, तर दुसरं...
Jaideep Ahlawat Buys Property In Mumbai: अभिनेता जयदीप अहलावतनं हा व्यवहार जून 2025 मध्ये रजिस्टर केलेला. म्हणजेच ज्यावेळी अभिनेत्यानं त्याचं पहिलं अपार्टमेंट खरेदी केलंय.

Jaideep Ahlawat Buys Property In Mumbai: दिवस-रात्र झगमगणाऱ्या मुंबईत (Property In Mumbai) आपल्या हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. यामध्ये सेलिब्रिटीही काही मागे नाहीत. अशाच एका इंडस्ट्रीत वर्षानुवर्ष संघर्ष करणारा अभिनेता जयदीप अहलावतनं (Jaideep Ahlawat) चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. एवढंच नाहीतर, प्रसिद्धी मिळवण्यासोबतच हरियाणातील या अभिनेत्यानं मुंबईत आपलं हक्काचं घरंही (House In Mumbai) खरेदी केलं आहे. अभिनेत्यानं अलिकडेच मुंबईतील अंधेरी पश्चिममधील (Andheri West) एक पॉश एरियार 10 कोटींचं एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. अशातच स्क्वेअर यार्ड्सच्या कागदपत्रांनुसार, जयदीप अहलावतनं त्याच रेसिडेन्शिअल इमारतीत आणखी एक अपार्टमेंट खरेदी केलं आहे.
अभिनेता जयदीप अहलावतनं हा व्यवहार जून 2025 मध्ये रजिस्टर केलेला. म्हणजेच ज्यावेळी अभिनेत्यानं त्याचं पहिलं अपार्टमेंट खरेदी केलं, त्यानंतर दोन आठवड्यांनी त्यानं त्याच्या दुसऱ्या अपार्टमेंटचं रजिस्टेशन केलेलं. जयदीप अहलावतनं काही दिवसांतच 20 कोटी रुपये खर्च केलेत. पहिलं अपार्टमेंट मे महिन्यात त्याच किमतीत खरेदी करण्यात आलं होतं आणि आता दुसरं अपार्टमेंट देखील त्याच इमारतीत वेगळ्या मजल्यावर आहे. दोन्ही अपार्टमेंटचं क्षेत्रफळ सारखंच आहे.
जयदीप अहलावतच्या घरांचा कार्पेट एरिया किती? (What Is The Carpet Area Of Jaideep Ahlawat's Houses?)
स्क्वेअर यार्ड्सच्या कागदपत्रांनुसार, जयदीप आणि त्यांची पत्नी ज्योती यांच्या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया 1,950 चौरस फूट आणि क्षेत्रफळ 217.47 चौरस मीटर आहे. त्यात चार कार पार्किंगचा समावेश आहे आणि त्यांनी स्टॅम्प ड्युटी म्हणून 60 लाख रुपये आणि नोंदणी शुल्कासाठी 30,000 रुपये दिलेत. ही सोसायटी अंधेरी पश्चिमेच्या मध्यभागी आहे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेपासून फक्त 3 किमी अंतरावर आहे.
दरम्यान, अंधेरी पश्चिम हा एक उत्तम परिसर आहे, जो मुंबईच्या मध्यभागी आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, लिंक रोड, एसव्ही रोड आणि वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो लाईन जयदीपच्या घराच्या अगदी जवळ आहे. गेल्या काही वर्षांत, या भागात अनेक मालमत्ता खरेदी केल्या गेल्या आहेत. विशेषतः हे ठिकाण सिने कलाकारांसाठी आवडची आहे.
जयदीप अहलावतच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, जयदीप अहलावत शेवटचा नेटफ्लिक्सच्या 'ज्वेल थीफ' या थ्रिलर चित्रपटात सैफ अली खान, कुणाल कपूर आणि निकिता दत्ता यांच्यासोबत दिसला होता. निगेटिव रिव्यू मिळूनही, हा चित्रपट नेटफ्लिक्सवर अनेक देशांमध्ये चार्टवर अव्वल स्थानावर होता. अभिनेत्याकडे 'पाताल लोक सीझन 2' आणि श्रीराम राघवनचा 'इक्कीस' यासह अनेक प्रोजेक्ट्स आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























