एक्स्प्लोर

मुन्नाभाई मधील ' देख ले ' गाण्यानं एका रात्रीत बनली स्टार, एका अपघातानं मेंदूच्या शिरा तुटल्या, कोमात गेली अन् सगळंच हिरावलं

मनोरंजन विश्वात वयाच्या 13व्या वर्षी तिने पदार्पण केलं. 18व्या वर्षी 'देख ले' या गाण्याने देशभरात तिने प्रसिद्धी मिळवली. अभिनेत्री मुमैत खानचे  वडील पाकिस्तानी आणि  आई दक्षिणात्य होती.

Dekh le Girl: मुन्नाभाई एमबीबीएस  चित्रपटातील 'देख ले' या गाण्यातली अभिनेत्री आठवतेय? या सिनेमासह या गाण्यानेही चांगलाच धुमाकूळ घातला होता. या गाण्यातील अभिनेत्री मुमैत खान एका रात्रीत प्रसिद्ध झाली. या गाण्यानंतर तिने अनेक हिंदी, तेलगु, आणि कन्नड  चित्रपटांमध्येही तिने बोल्ड भूमिका साकारल्या. मात्र, काही भूमिकानंतर ती बॉलीवूडमधून अचानक गायब झाली, ती परत कुठे दिसली नाही. (Mumait Khan)

मनोरंजन विश्वात वयाच्या 13व्या वर्षी तिने पदार्पण केलं. 18व्या वर्षी 'देख ले' या गाण्याने देशभरात तिने प्रसिद्धी मिळवली. अभिनेत्री मुमैत खानचे  वडील पाकिस्तानी आणि  आई दक्षिणात्य होती. तिनं तिचं बालपण मुंबईत घालवलं . पण शहरातली चमक आणि ग्लॅमरच्या मागे तिच्या कुटुंबाला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. तिच्या पालकांनी कधीही तिच्यावर काम करण्यासाठी दबाव आणला नाही. नुकतीच आय ड्रीम मीडियाशी बोलताना मुमैतने आठवण सांगितली " माझ्या पालकांनी मला कधीही पैसे कमवायला सांगितलं नाही. आम्ही मोठे होत असताना माझ्या बहिणीला आणि मला जाणवले की आमचे पैसे संपत आहेत. आम्हाला हे माहीत होते. लहानपणी मी दीड रुपया वाचवण्यासाठी शाळेत चालत जायचे . मी ते माझ्या पिगी बँक मध्ये ठेवायचे आणि नंतर माझ्या वडिलांना द्यायचे. त्यांनी कधीही ते पैसे आम्हाला मागितले नाहीत. पण नेहमीच त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं आम्हाला वाटायचं. "

एका अपघातानं सगळचं हिरावलं 

मुमताज  अब्दुल रशीद खानची मुमैत खान झाली आणि तिची बहीण जमीन खान म्हणून इंडस्ट्रीमध्ये आली . देख ले गाण्यानंतर मुमैतला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या गाण्यानंतर तिने हलचल, लकी नो टाईम फॉर लव्ह, रावडी राठोड यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच तेलगू मध्ये छत्रपती आणि पोकिरी यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये ही ती झळकली. इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मागणी असलेल्या आयटम नंबर कलाकारांपैकी ती एक बनली. पण एक गंभीर अपघात झाला आणि तिचं अख्ख करिअर थांबलं.

करिअरच्या शिखरावर असताना अभिनेत्री मुमैत खानाच्या घरी एक गंभीर अपघात झाला. या अपघातामुळे तिच्या मेंदूच्या नसा खराब झाल्या. ती 15 दिवस कोमात होती. तिला झटके आले. त्यानंतर डॉक्टरांनी जो सल्ला दिला तो तिच्या करिअरसाठी मृत्युदंड ठरला. तिला सांगण्यात आलं होतं पुढची किमान सात वर्ष तुला कोणतही काम,व्यायाम, शारीरिक श्रम करता येणार नाही. 

तिने सांगितले ' मी मनोरंजनसृष्टी सोडली नाही . माझा अपघात झाला. माझ्या मेंदूतील पाच नसा तुटल्या. डॉक्टरांनी मला किमान सात वर्ष काम करू नये असं सांगितलं होतं. मला कुठलेही वजन उचलणं शक्य नव्हतं. मला झटके येत होते. यासाठी माझ्यावर औषधोपचार सुरू होते . या औषधांमुळे माझे वजन खूप वाढले . देवाने मला मुमैत खान बनवले आणि नंतर स्वतःच मला या नावापासून दूर केले. मीही आता हे स्वीकारले आहे. मी ही सात वर्ष अभ्यासासाठी वापरली . ती सात वर्ष अपरिहार्यपणे थांबली. पण वाया गेली नाहीत. माझ्या आईच्या मदतीने या वेळेचा उपयोग भविष्याबद्दल विचार करण्यासाठी, बरे होण्यासाठी आणि आयुष्याची पुनर कल्पना करण्यासाठी केला, असं मुमैतने सांगितले.

व्यवसाय उघडला, त्यातही फसवली गेली 

याच काळात मुमैत खानला जाणवले की अभिनयही तिची एकमेव ओळख असू नये . तिला नेहमीच आवडणाऱ्या गोष्टींमधून उत्तर मिळाले की तिला नक्की काय आवडतं. या सात वर्षात मला विचार करण्यासाठी खूप वेळ मिळाला. मला कळले की खरोखर मेकअप आणि केस या दोन गोष्टी मला मनापासून आवडतात. मी प्रत्येक चित्रपटात, प्रत्येक गाण्यात कधीही एकच लूक पुन्हा दाखवला नाही. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन होते. या कल्पनेनंतर तिने मेकअप आणि केस प्रशिक्षण संस्था उघडली. हैदराबादमध्ये अशा गोष्टींचा अभाव आहे. दक्षिणेतल्या उद्योगांमध्ये आम्हाला सहसा असे उपचार मिळत नाही. मी माझे केस मेकअप आणि स्टाईलिंग टीम ही मुंबईहून आणायचे. हेच सगळं मला इथे आणायचे होते. ही अकॅडमी सुरू करणे माझ्यासाठी सोपे नव्हते. व्यवसाय सुरू करताना माझी दोनदा फसवणूक ही झाली. माझा व्यवसाय आधीच सुरू व्हायला हवा होता. मी 2023 मध्येच सुरू करणार होते पण मला सगळं काही सुरुवातीपासून सुरू करावे लागले. त्यासाठी वेळ लागला . आज ही अकॅडमी पूर्णपणे कार्यरत आहे. यातील अभ्यासक्रम एका आठवड्यापासून आठ आठवड्यांपर्यंत आहे. याची फीस 20000 ते 50 हजार रुपयांमध्ये आहे. असेही तिने सांगितले.

40व्या वर्षी सिंगल 

चाळीस वर्षांची मुमैत खान अविवाहित आहे. अविवाहित असल्याचा कुठलाही पश्चाताप दिला नाही. ती म्हणाली ' मी सामान्य मुलगी नाही. माझ्याकडे एक पुरुष आणि दोन स्त्रीया आहेत. मी वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. मी चार गंभीर नात्यांमध्ये आहे. सध्या मी माझ्या मर्जीने सिंगल आहे. मी तेराव्या वर्षी काम करायला सुरुवात केली.  पण दैवाने माझ्या आयुष्यावर ब्रेक लागला. लहानपणापासून माझी मानसिकता अशी होती की मी माझ्या पालकांसाठी काम करत आहे. लग्न किंवा मुलांबद्दल विचार करण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता. आता तर मी अधिक बिझनेस माइंडेड झाली आहे. त्यामुळे वैयक्तिक नातेसंबंधांना जागा नव्हती.

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget