एक्स्प्लोर

स्नॅपचॅटवर ॲसिड अटॅकची धमकी, मॉडेलच्या अंगावर थेट कार घातली, फरफटत नेलं; मुंबईतील लोखंडवाल्यात थरार, CCTV समोर

या घटनेदरम्यान आरोपीने कारचा जोरदार धक्का दिल्याने मॉडेल कारच्या बोनटवर आदळली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली.

Mumbai Crime: मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने थेट मॉडेलच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी मोहम्मद शकील शेखकडून मॉडेलचा मैत्रिणीच्या स्नॅपचॅटवर ॲसिड अटॅक करण्याची धमकी देण्यात आली होती.त्यानंतर हा प्रकार घडलाय. (Mumbai Crime)

नेमकं घडलं काय?

सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास लोखंडवाला परिसरातील अरीना बिल्डिंगच्या गेटजवळ ही घटना घडली. संबंधित मॉडेल इमारतीच्या गेटजवळ उभी असताना आरोपीने अचानक स्कोडा कार तिच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच तिच्या मदतीसाठी दोन जण धावून गेले. मात्र आरोपीने त्या तिघांवरही पुन्हा कार घालण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. डायना सईद डेबस्तानी असे या मॉडेल तरुणीचे नाव आहे. या घटनेदरम्यान आरोपीने कारचा जोरदार धक्का दिल्याने मॉडेल कारच्या बोनटवर आदळली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली. या घटनेत मॉडेल किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या प्रकरणी मॉडेलने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपीचे नाव मोहम्मद शकील शेख (वय 29) असे असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने यापूर्वी मॉडेलच्या मैत्रिणीच्या स्नॅपचॅट अकाउंटवरून ऍसिड अटॅकची धमकी दिली होती. या धमकीबाबत विचारणा केली असता आरोपीला राग आला आणि त्यातूनच त्याने हा टोकाचा प्रकार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, आरोपीविरोधात भारतीय दंड विधानानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. ओशिवरा पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

घटनेचा CCTV समोर

मॉडेल तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गेल्या नऊ महिन्यांपासून आरोपी मॉडेल तरुणीविषयी मित्रांमध्ये, कुटुंबामध्ये अफवा पसरवण्याचे काम करत आहे. त्यावरून त्यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद आहेत. काल (३ फेब्रुवारी) आरोपीला जाब विचारण्यासाठी पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण गेल्या. आरोपी समोर येत नसल्याने मोठ्याने त्याला बोलवत होत्या. नंतर दुसऱ्या दिवशी मैत्रिणीच्या स्नॅपचॅटवर मेसेज आला.  ऍसिड अटॅकचा मेसेज आला.  बिल्डींगच्या खाली आरोपी समोर आला. बिल्डींगच्या गेटमधुन आत गाडी घेवुन येण्याचा प्रयत्न करू लागला. माझ्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याने पुन्हा गाडी मागे घेतली व पुन्हा गाडी अंगावर घातली. मला दुखापत होईल अशा पद्धतीने बेदरकारपणे गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. असा आरोप मॉडेल तरुणीने केला आहे. या घटनेचा cctvही समोर आला असून ओशिवरा पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे 

महत्त्वाच्या बातम्या

4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget