मृणाल ठाकूर सुधरेना! बिपाशा बासूनंतर आता अनुष्का शर्माची मापं काढली, नेटकऱ्यांनी ट्रोलिंग सुरु
Mrunal Thakur criticised Anushka Sharma : मृणाल ठाकूर सुधरेना! बिपाशा बासूनंतर आता अनुष्का शर्माची मापं काढली, नेटकऱ्यांनी ट्रोलिंग सुरु

Mrunal Thakur criticised Anushka Sharma : अभिनेत्री मृणाल ठाकूर पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. कारण तिच्या जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने खुलासा केला आहे की तिने एक मोठा सिनेमा नाकारला होता, जो पुढे जाऊन ब्लॉकबस्टर ठरला. मात्र तिने त्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्रीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद रंगला आहे.
अभिनेत्री मृणाल ठाकूर व्हायरल व्हिडीओमध्ये म्हणाली, “खूपदा. मी नाही म्हटलं, कारण मी तयारच नव्हते. वाद निर्माण झाले असते. तो सिनेमा सुपरहिट झाला आणि त्या अभिनेत्रीला खूप मदत झाली. पण नंतर मला जाणवलं की जर मी त्या वेळेस तो सिनेमा केला असता, तर मी स्वतःलाच हरवून बसले असते.”
तिने पुढे सांगितले की तो प्रोजेक्ट न केल्याचा तिला दीर्घकालीन फायदा झाला. ती म्हणाली, “ती (अभिनेत्री) आत्ता काम करत नाहीये, पण मी करतेय हेच माझं यश आहे. मला तात्काळ समाधान, तात्काळ ओळख, तात्काळ प्रसिद्धी नको आहे कारण जे काही लगेच मिळतं ते लगेच हरपून जातं.”
Mrunal could have avoided that last part , she really gives out mean girl energy …. pic.twitter.com/cUsaaJwsxp
— ash 💅 (@ashilikeit) August 31, 2025
या वक्तव्याने लगेचच नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आणि त्यांनी मृणाल कोणत्या सिनेमाबद्दल व अभिनेत्रीबद्दल बोलत होती यावर अंदाज लावायला सुरुवात केली. एका युजरने लिहिलं, “मला वाटतं हा ‘सुलतान’ आणि अनुष्का आहे.” दुसऱ्याने म्हटलं, “चित्रपट - सुलतान, अभिनेत्री - अनुष्का शर्मा. कारण मी एक व्हिडिओ पाहिला होता ज्यात मृणाल म्हणाली होती की तिला सुलतान ऑफर झाला होता पण शेवटी अनुष्काची निवड झाली. शिवाय, अनुष्का सध्या काम करत नाही”
ही पहिली वेळ नाही की मृणाल तिच्या जुन्या वक्तव्यांमुळे ट्रोल झाली आहे. काही दिवसांपूर्वी तिचा अभिनेता अर्जित तनेजासोबतचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात तिने बिपाशा बासूच्या शरीरयष्टीवर भाष्य केले होते. त्या व्हिडिओत मृणाल म्हणाली होती, “तुला पुरुषी दिसणारी आणि मसल्स असलेली मुलगी लग्नासाठी हवी आहे का? तर मग बिपाशाशी लग्न कर.” पुढे ती म्हणाली, “सांगते, मी बिपाशापेक्षा खूप चांगली आहे, ओके?”
तिच्या या वक्तव्यावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आणि मृणालवर बिपाशाला बॉडी-शेम केल्याचा आरोप केला. त्यानंतर मृणालने इंस्टाग्रामवर माफी मागितली. तिने लिहिलं, “19 वर्षांची मी किशोरवयीन असताना अनेक मूर्खपणाचे बोलले. मला तेव्हा माझ्या शब्दांचा वजन किंवा गंमतीत केलेलं बोलणं सुद्धा कुणाला दुखावू शकतं हे समजत नव्हतं. पण ते झालं आणि त्याबद्दल मला मनापासून खेद वाटतो.”
मृणाल ठाकूर पुढे म्हणाली, “माझा कधीच कुणाला बॉडी-शेम करण्याचा हेतू नव्हता. ती फक्त मुलाखतीत थट्टा होती जी जरा जास्त झाली. पण मला कळलं की ते कसं ऐकवलं गेलं आणि मला खरोखर वाटतं की मी शब्द वेगळे निवडायला हवे होते. वेळ जसजसा गेला तसतसं मला जाणवलं की सौंदर्य अनेक प्रकारचं असतं आणि आज मी त्याला खूप महत्त्व देते.”
बिपाशानेही मृणालचं नाव न घेता एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये तिने स्त्रियांनी एकमेकींना प्रोत्साहन देणं किती महत्त्वाचं आहे यावर भर दिला होता. बिपाशाने लिहिलं होतं, “सशक्त स्त्रिया एकमेकींना उचलून धरतात. सुंदर महिलांनो, मसल्स मिळवा… आपण मजबूत राहायला हवं… मसल्स तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य कायम उत्तम ठेवतात! जुन्या विचारसरणीला झुगारा द्या की स्त्रिया ताकदवान दिसायला नकोत किंवा शारीरिकदृष्ट्या बलवान नसाव्यात!”
इतर महत्त्वाच्या बातम्या























