Most Popular Actress In India: ना दीपिका, ना आलिया, ना कतरिना अन् ना प्रियांका; 'या' अभिनेत्रींनं सगळ्यांना पछाडलं, देशातील टॉप 10 अॅक्ट्रेसची यादी पाहिलीत?
Most Popular Actress In India: मार्च महिन्यातील भारतातील 10 सर्वात लोकप्रिय महिला स्टार्सची यादी जाहीर झाली आहे. या यादीत, दक्षिणेकडील सौंदर्यवतींनी बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकलं आहे.

Most Popular Actress In India: बॉलिवूड (Bollywood) आणि बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल (Bollywood Actress) नेहमीच चर्चा रंगलेली असते. ज्यावेळी लोकप्रिय अभिनेत्रींचा विचार केला जातो, त्यावेळी डोळ्यांसमोर सर्वात आधी आलिया भट्ट (Alia Bhatt), दीपिका पदुकोण (Deepika Padukone), कतरिना कैफ (Katrina Kaif) यांसारख्या बड्या अभिनेत्रींची नावं समोर येतात. पण, सध्या एक रिपोर्ट समोर आला आहे, त्यात मात्र काहीतरी वेगळंच आहे. ऑरमॅक्स मीडियानं मार्च महिन्यासाठी भारतातील 10 सर्वात लोकप्रिय महिला स्टार्सची यादी (List Of 10 Most Popular Female Stars in India) जाहीर केली आहे. या यादीत, दक्षिणेकडील सौंदर्यवतींनी (South Actress) बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकल्याचं दिसत आहे.
भारतातील 10 सर्वात लोकप्रिय महिला स्टार्सच्या ताज्या यादीत समंथा प्रभू (Samantha Ruth Prabhu) अव्वल स्थानावर आहेत. आलिया भट्ट (Alia Bhatt) दुसऱ्या क्रमांकावर तर दीपिका पदुकोण तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत 10 नावांपैकी फक्त तीन बॉलिवूड अभिनेत्री आहेत. आलिया आणि दीपिकाशिवाय या यादीत तिसरं नाव कतरिना कैफचं (Katrina Kaif) आहे, जे दहाव्या क्रमांकावर आहे.
रश्मिका मंदानासह बड्या साऊथ अॅक्ट्रेसचा या यादीत सहभाग
काजल अग्रवाल यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, तर रश्मिका मंदाना पाचव्या क्रमांकावर आहे. साई पल्लवीनं सहावं स्थान पटकावलं आहे आणि त्रिशा कृष्णननं सातवं स्थान पटकावलंय. याशिवाय, नयनतारा आठव्या आणि अनुष्का शेट्टी नवव्या स्थानावर आहे.
समंथा प्रभूच्या चाहत्यांसाठी खुशखबर
सामंथा प्रभूचं नाव पहिल्या क्रमांकावर पाहून चाहते खूप आनंदी आहेत. एका चाहत्यानं लिहिलंय की, "कोणताही चित्रपट नसतानाही समंथा नेहमीच अव्वल राहते, हीच खरी महिला सुपरस्टार आहे." काही लोक रश्मिका मंदानाला सर्वोत्तम म्हणत आहेत, तर काही युजर्स नयनताराचं कौतुक करत आहेत.
भारतातील टॉप 10 अॅक्टर्सची यादीही जाहीर
ऑरमॅक्स मीडियानं भारतातील टॉप 10 अॅक्टर्सची यादी देखील जाहीर केली आहे. या यादीतही एका दक्षिणात्या अभिनेत्यानं बाजी मारली आहे. टॉप 10 लोकप्रिय स्टार्सच्या यादीत प्रभासचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर, थलापती विजय, अल्लू अर्जुन, शाहरुख खान, महेश बाबू आणि अजित कुमार सारख्या स्टार्सची नावं आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :


















