एक्स्प्लोर

Mob Attack Actor : धक्कादायक ! जमावाने केलेल्या हल्ल्यात अभिनेता रक्तबंबाळ, आईसोबत मंदिरातून परताना झाला हल्ला

Mob Attacks Kannada Actor Chetan Chandra : आईसोबत मंदिरातून परतत असताना अभिनेता चेतन चंद्रावर जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात अभिनेता गंभीर जखमी झाला.

Mob Attacks Kannada Actor Chetan Chandra :  दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता चेतन चंद्रा (Chetan Chandra) याच्यावर जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात चेतन चंद्रा गंभीर जखमी झाला आहे. अज्ञातांनी केलेल्या मारहाणीत चेतन चंद्रा रक्तबंबाळ झाला आहे. ही घटना 12 मे रोजी बेंगळुरूमध्ये घडलीय. या हल्ल्यानंतर जखमी झालेल्या चेतन चंद्राने व्हिडीओ शेअर केला.  चेतन चंद्रा हा कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. 

रविवारी चेतन चंद्रा मदर्स डे निमित्ताने आईसोबत मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. मंदिरातून परतत असताना जमावाने मारहाण केली. यामध्ये अभिनेत्याचे नाक तुटले आहे. 

इंस्टाग्रामवर अभिनेता चेतन चंद्रा याने रक्तबंबाळ अवस्थेत एका व्हिडीओ शेअर केला आहे. मला न्याय हवा, अशी कॅप्शन देत आपल्यावर झालेल्या हल्ल्याबाबत  माहिती दिली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chetan Chanddrra (@chetan_chanddrra)

नशेत असणारी व्यक्ती करत होती पाठलाग

व्हिडिओमध्ये चेतन चंद्राने सांगितले की एका मद्यधुंद व्यक्तीने त्याचा पाठलाग केला आणि त्याच्या कारचे नुकसान केले. चेतनने सांगितले की, तो माणूस मला लुटण्याचा प्रयत्न करत होता. म्हणून, मी त्याच्याकडे गेलो आणि कारच्या नुकसानीबद्दल विचारले. काही मिनिटांतच एक महिला आणि सुमारे 20 लोक तेथे जमले आणि त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली.

पुन्हा आले आणि कारची मोडतोड केली...

 चेतनने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ लाईव्ह सेशनवर रेकॉर्ड केला. माझ्यासोबत आज काय झाले, त्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि माझे नाक तोडले असे त्याने सांगितले.  पोलिसांनी प्राथमिक उपचार केले. मात्र, हल्ला करणारी टोळी पुन्हा आली आणि त्यांनी माझ्या कारचे नुकसान केले. हा धक्कादायक अनुभव असल्याचे चेतनने सांगितले. 

एक संशयित अटकेत... 

चेतन चंद्राने सांगितले की, या घटनेनंतर ताबडतोब पोलिसांची मदत घेतली आणि तक्रार नोंदवली. कागलीपुरा पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला.  ल्लेखोर दारूच्या नशेत होता आणि अभिनेत्याच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता, असे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितालाही अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

कन्नड टीव्ही, चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता...

चेतन चंद्रा हा कन्नड चित्रपट आणि टीव्हीतील प्रसिद्ध नाव आहे. टीव्ही मालिका 'सत्यम शिवम सुंदरम'मुळे लोकप्रिय झाला. त्याशिवाय काही कन्नड चित्रपटात छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget