एक्स्प्लोर

पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

माहेरहून पैसे आणणे, सदनिका नावावर करून देणे आणि घटस्फोटासाठी सासरी होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आयटी अभियंता महिलेने आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील केशवनगर येथे घडली.

पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी संबोधलं जाणाऱ्या पुण्यात (Pune) गेल्या काही महिन्यातील गुन्हेगारीच्या घटनांनी शहराच्या वैभवाला गालबोट लागलं आहे. विशेष म्हणजे, सासरच्यांच्या छळाला कंटाळून सुनेनं जीवन संपवल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. आता, पुन्हा एकदा पुण्यातील मुंढवा येथे सासरच्या छळास कंटाळून आय.टी. अभियंता महिलेनं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी, मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल झाला आहे.

माहेरहून पैसे आणणे, सदनिका नावावर करून देणे आणि घटस्फोटासाठी सासरी होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आयटी अभियंता महिलेने आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील केशवनगर येथे घडली. त्रिष्णा राहुल सकपाळ (वय 33, रा. केशवनगर, मुंढवा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडिलांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 29 सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास त्रिष्णा हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर, मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी पती राहुल संजय सकपाळ, सासू वैशाली संजय सकपाळ, सासरे संजय मनोहर सकपाळ, नणंद शैली संजय सकपाळ आणि आजेसासू शकुंतला साळुंके (सर्व रा. डिफेन्स कॉलनी, हडपसर) या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्रिष्णा हिचा विवाह 2018 मध्ये राहुल सकपाळ यांच्याशी झाला होता. लग्नात तिच्या माहेरच्यांनी 13 तोळे सोन्याचे दागिने दिले होते, तरीही सासरच्या मंडळींकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती, असा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे, त्रिष्णा ही देखील एका आयटी कंपनीत नोकरीस होती. 

त्रिष्णाकडे तिचा संपूर्ण पगार देण्यासह माहेरची सदनिका सासूच्या नावावर करण्यासाठी तिचा सतत छळ सुरू होता. तसेच, सासऱ्यांनी तिच्या नावावर एक कोटींचा फ्लॅट घेऊन देण्याचा देखील तगादा लावला होता. वारंवार होणाऱ्या मारहाण व छळामुळे दोघे पती-पत्नी 2021 मध्ये केशवनगर येथे वेगळे राहू लागले. मात्र, तिथेही पतीने मारहाण करून घराबाहेर काढल्याने ती माहेरी निघून आली होती. त्यानंतर, पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. दरम्यान, आत्महत्येपूर्वी त्रिष्णाने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात 'पती, सासू, सासरे, नणंद आणि आजेसासू यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असून, तेच माझ्या मृत्यूला जबाबदार आहेत,' असा उल्लेख केला आहे. याप्रकरणी, अधिक तपास मुंढवा पोलिस करत आहेत.

हेही वाचा

ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
Nagpur Couple Death Marathi News: दिवाळीसाठी आले, शिक्षक दाम्पत्याने जीवन संपवले; नागपुरमधील खळबळजनक घटना
दिवाळीसाठी आले, शिक्षक दाम्पत्याने जीवन संपवले; नागपुरमधील खळबळजनक घटना
Nagpur Fire Accident: दिवाळीच्या दिवशी राज्यभर आगींचा भडका! नागपूर शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे 43 ठिकाणी आग, TVS शोरूमच्या आगीत 45 दुचाकी जळून खाक
दिवाळीच्या दिवशी राज्यभर आगींचा भडका! नागपूर शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे 43 ठिकाणी आग, TVS शोरूमच्या आगीत 45 दुचाकी जळून खाक
Amravati Crime News: दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
Embed widget