एक्स्प्लोर

Nana Patekar Kon Honaar Crorepati: माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'

Nana Patekar Kon Honaar Crorepati: माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना पाटेकर, पण...

Kon Honaar Crorepati Nana Patekar: नाना पाटेकर (Nana Patekar). असे अभिनेते ज्यांनी खलनायक, नायक अन् कॉमेडी सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आज नाना पाटेकर हयात नाहीत. पण त्यांच्या आठवणी सिनेमातून प्रेक्षकांमध्ये कायम जिवंत राहिल. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीला धक्का बसला.   नाना पाटेकर यांनी आपल्या कारकि‍र्दीत अविस्मरणीय भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. आजही प्रेक्षकांच्या मनामनात नाना पाटेकर जिवंत आहेत. हिंदी सिनेमासह त्यांनी मराठी सिनेमातही उत्तम कामगिरी केली. नाना पाटेकर 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात हजेरी लावणार होते. या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) करत आहे. या शोच्या प्रीमिअर एपिसोडमध्ये नाना पाटेकर होस्ट (Kon Honaar Crorepati) म्हणून येणार होते, अशी माहिती समोर आली आहे.

माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना पाटेकर (Nana Patekar Was Invited in Madhuri Dixits Kon Honaar Crorepati)

नाना पाटेकर 'कोण होणार करोडपती'मध्ये  येणार होते. नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित या दोघांनी  एकत्र 1998  साली रिलीज झालेल्या 'वजूद' या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमानंतर दोघेही एकत्र एकाच व्यासपीठावर 'कोण होणार करोडपती' च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार होते. माधुरी दीक्षित आणि नाना पाटेकर या दोघांना पुन्हा एकदा एकत्र एकाच  स्क्रीनवर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर होते. नाना पाटेकर 'कोण होणार करोडपती' या शोच्या पहिल्या भागात दिसणार होते. शूटिंग नेमकं कधी करायचं, हे देखील ठरलं होतं. 

परंतु, 8 ऑक्टोबर 2026 रोजी, वयाच्या 75 व्या वर्षी  नाना पाटेकर यांचं निधन झालं. त्यामुळे 'कोण होणार करोडपती' या शोच्या शूटिंगच्या प्लानमध्ये बदल करण्यात आला. आता नाना पाटेकर यांच्या जागी अभिनेत्री सोनाली बेंद्रे  शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये गेस्ट म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'कोण होणार करोडपती' या शोचे काही प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  या शोच्या माध्यमातून माधुरी दीक्षित आणि सोनाली बेंद्रे पहिल्यांदाच एकत्र प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  आपल्या फिल्मी कारकि‍र्दीत दोघांनी एकत्र कधीही बिग स्क्रीनवर काम केलेलं नाही.  

'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात दोघांनीही फिल्मी करिअर, चित्रपट आणि  वैयक्तिक आयुष्याबाबत एकमेकांशी चर्चा केली. माधुरी दीक्षितसाठी सोनाली बेंद्रेसोबत स्क्रीन शेअर करणे, खास क्षणांपैकी एक आहे. कारण, तिने सांगितले की, यापूर्वी दोघांनीही एकत्र कोणत्याही सिनेमात काम केलेलं नाही. माधुरी दीक्षितचा 'कोण होणार करोडपती' हा शो 12 ऑक्टोबर रोजी रिलीज झाला असून,  सोनी लाइव्हवर आपण पुढील एपिसोड्स पाहू शकता.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jailer 2 OTT: रजनीकांत यांचा जलवा आता घरबसल्या पाहता येणार; 'जेलर 2'ची OTT रिलीज डेट जाहीर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?
रजनीकांत यांचा जलवा आता घरबसल्या पाहता येणार; 'जेलर 2'ची OTT रिलीज डेट जाहीर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?
Kareena Kapoor khan on Saif ali khan Attack: 'मी वेड्यासारखी ऑटो थांबवण्यासाठी रस्त्यावर पळत होते'; सैफ अली खानवरील हल्ल्याच्या रात्री काय घडलं? अभिनेत्रीने दिली A to Z माहिती
'मी वेड्यासारखी ऑटो थांबवण्यासाठी रस्त्यावर पळत होते'; सैफ अली खानवरील हल्ल्याच्या रात्री काय घडलं? अभिनेत्रीने दिली A to Z माहिती
Amruta Khanvilkar: 'प्रेमात पडणे हा माझा गुन्हा आहे'; अमृता खानविलकरने कबूल केले 3 गुन्हे, दुसऱ्या गुन्ह्याबाबत अभिनेत्री म्हणाली...
'प्रेमात पडणे हा माझा गुन्हा आहे'; अमृता खानविलकरने कबूल केले 3 गुन्हे, दुसऱ्या गुन्ह्याबाबत अभिनेत्री म्हणाली...
Dhanush Spotted With Mystery Woman: धनुषसोबत मिस्ट्री वुमन स्पॉट, व्हिडीओ तुफान व्हायरल, साऊथ सुपरस्टारसोबत दिसलेली 'ती' कोण?
धनुषसोबत मिस्ट्री वुमन स्पॉट, व्हिडीओ तुफान व्हायरल, साऊथ सुपरस्टारसोबत दिसलेली 'ती' कोण?
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
Embed widget