एक्स्प्लोर

Mirzapur 2 : नेटकऱ्यांची 'बायकॉट मिर्झापूर 2' मोहीम; अली फजल, फरहान अख्तरचा विरोध

'मिर्झापूर 2' या वेब सीरिजचा काल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या चाहत्यांनी मात्र आनंद व्यक्त केला. परंतु, काही वेळातच सोशल मीडियावर 'बायकॉट मिर्जापुर 2' हा हॅश टॅग ट्रेंड होऊ लागला.

नवी दिल्ली : मोस्ट अवेटेड वेब सीरीज मिर्झापूर 2 चा ट्रेलर लॉन्च झाला आहे. ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर एकीकडे अनेक चाहते ट्रेलरचं कौतुक करत असून दुसरा सीझन पाहण्यासाठी उत्सुक आहे. तर दुसरीकडे काही लोक मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनवर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. यामागील कारण म्हणजे, या वेब सीरिजमधील लीड अॅक्टर अली फजल आणि को-प्रोड्यूसर फरहान अख्तर हे आहेत. ट्विटरवर लोक अली फजलच्या मागच्या पोस्टबाबत नाराज आहेत. डिसेंबर 2019मध्ये त्यांनी सीएए आणि एनआरसी या दोन्ही कायद्यांना विरोध केला होता.

युजर्सनी ट्विटरवर अली फजल म्हणजेच मिर्झापूरमधील गुड्डूच्या डायलॉगचा आधार घेतला आहे. तर अनेक युजर्सनी लिहिलं आहे की, "शुरू मजबूरी में किए थे, अब मजा आ रहा है!" तसेच फरहान अख्तरचा विरोध सीएए विरोधातील आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळे करण्यात येत आहे.

फ्रीमध्येही पाहणार नाही मिर्झापूर 2

एका युजरने मिर्झापूरचं एक पोस्टर शेअर करत लिहिलं आहे की, 'देशाप्रती बेईमान असणाऱ्या लोकांच्या वेब सीरीज किंवा चित्रपट पाहिले नाही पाहिजे.' तसेच यासोबत बायकॉट मिर्जापुर 2 चा हॅशटॅग दिला आहे. तसेच आणखी एका युजरने लिहिलं आहे की, 'मी मिर्झापूर फ्रीमध्येही पाहणार नाही.'

नेटकऱ्यांची 'बायकॉट मिर्झापूर 2' मोहीम 

दुसऱ्या सीझनमध्ये नव्या कलाकारांची एन्ट्री

उत्तम पटकथा, संवाद आणि विषयाच्या उत्तम मांडणीमुळे प्रेक्षकांनी पहिल्या सिरीजला उत्तम प्रतिसाद दिला आणि त्याच विषयाला पुढे नेणारे 'मिर्झापूर'चे दुसरे पर्व अधिक रोमांचक आणि उत्तम बनले आहे. यात पंकज त्रिपाठी, अली फझल, दिव्येंदु, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल, हर्षिता शेखर गौर, अमित सियाल, अंजुम शर्मा , शिबा चड्डा, मनू ऋषी चड्डा आणि राजेश तेलंग यांसारख्या कलाकारांसोबतचा हा अॅक्शन पॅक प्रेक्षकांना आता ड्रग्स, ऍक्शन आणि जगण्यासाठीचा थरारक लढा याचा अनुभव देणार आहे. 'मिर्झापुर'च्या दुसऱ्या सिरीजमध्ये विजय वर्मा, प्रियांशु पेंयुली आणि ईशा तलवार दिसणार आहेत.

पाहा ट्रेलर : 

एकापेक्षा एक डायलॉग्सची चाहत्यांसाठी मेजवानी

पहिल्या सीझनच्या शेवटी मुन्ना भैय्या बबलु पंडीत आणि गुड्डू पंडीतच्या बायकोला गोळ्या घालून ठार करतो. त्याचाच बदला या सीझनमध्ये गुड्डू पंडीत घेणार आहे. तसेच त्याच्यासोबत श्वेताही बंदूकीसोबत खेळताना दिसून आली आहे. ट्रेलरमध्ये 'अब हमको बदला लेना है, और मिर्झापूर भी.', 'इस मिट्टी का उधार है हम पर, चुकाना है' आणि 'आप चाहते थे कि आपकी बेटी मिर्जापुर पर राज करे, बड़ी ना सही छोटी बेटी राज करेगी' अशा एकापेक्षा एक डायलॉग्सची चाहत्यांसाठी मेजवानी आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Mirzapur 2 Trailer : 'जो आया है, वो जाएगा भी। बस, मर्जी हमारी होगी' ; 'मिर्झापूर 2'चा रक्तरंजित ट्रेलर प्रदर्शित

महत्त्वाच्या बातम्या

Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Maharashtrachi HasyaJatra: पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Embed widget