Merry Christmas Leak : कतरिना कैफ-विजय सेतुपतीचा 'मेरी ख्रिसमस' रिलीज होताच ऑनलाईन लीक; पहिल्याच दिवशी निर्मात्यांना मोठा फटका
Merry Christmas : कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा 'मेरी ख्रिसमस' हा सिनेमा रिलीज होताच ऑनलाईन लीक झाला आहे.

Merry Christmas Online Leak : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) हा सिनेमा आज (12 जानेवारी 2024) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता रिलीज होताच हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. त्यामुळे निर्मात्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
'मेरी ख्रिसमस'ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. अखेर आता हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉलिवूडची नायिका कतरिना आणि दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील सुपरस्टार विजय अशी कमाल जोडी असलेल्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
'मेरी ख्रिसमस' ऑनलाईन लीक
'मेरी ख्रिसमस' हा सिनेमा रिलीज होताच अनेक ऑनलाईन साइट्सवर लीक झाला आहे. सिनेमा रिलीज झाल्यानंतर कतरिना कैफ आणि विजय पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण हा सिनेमा रिलीज झाल्याच्या काही तासांत ऑनलाईन लीक झाल्याने निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे.
View this post on Instagram
'मेरी ख्रिसमस' या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये खूपच कमी कमाई केली होती. अशातच आता हा सिनेमा ऑनलाईन लीक झाल्याने निर्मात्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीचा 'मेरी ख्रिसमस' हा सिनेमा तमिळरॉकर्स, मूवीरुल्ज, फिल्मीजिला आणि टोरेंट सारख्या साईट्सवर रिलीज झाला आहे. या साईट्सवर हा सिनेमा एचडी क्वालिटीमध्ये उपबब्ध आहे. सिनेमा ऑनलाईन लीक झाल्याने निर्मात्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'हे' सिनेमेही ऑनलाईन लीक
कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीच्या 'मेरी ख्रिसमस' या सिनेमाआधी अनेक सिनेमे ऑनलाईन लीक झाले आहे. यात रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) या सिनेमापासून शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान'पर्यंत (Jawan) अनेक सिनेमांचा समावेश आहे. कतरिनाचा 'मेरी ख्रिसमस' हा सिनेमा विकी कौशलच्या पसंतीस उतरला आहे. पत्नीचं कौतुक करत त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने "कतरिनाचं आतापर्यंतचं सर्वोत्तम काम" असं म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
Merry Christmas Review : खुर्चीला खिळवून ठेवणारा विजय सेतुपती अन् कतरिना कैफचा 'मेरी ख्रिसमस'; वाचा रिव्ह्यू
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
