एक्स्प्लोर

Masaledar Kitchen Kallakar : संजय राऊत ‘सुरी’, तर किरीट सोमय्या ‘भोंगा’! ‘मसालेदार किचन कल्लाकार’मध्ये किशोर पेडणेकरांना आली नेत्यांची आठवण!

Masaledar Kitchen Kallakar : ‘मसालेदार किचन कल्लाकार’च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar), भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील (Rupali Patil) यांनी सहभाग घेतला होता.

Masaledar Kitchen Kallakar : झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ हा कुकरी शो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. आता ‘किचन कल्लाकार’चं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पर्वाचं नाव ‘मसालेदार किचन कल्लाकार’ (Masaledar Kitchen Kallakar ) असं आहे. यावेळेस या कार्यक्रमात झणझणीत मराठी तडका देखील दिसतो आहे. त्यामुळे या नवीन तडक्यात काय काय पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. ‘मसालेदार किचन कल्लाकार’च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar), भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील (Rupali Patil) यांनी सहभाग घेतला होता.

आता एकाच मंचावर जेव्हा इतक्या दिग्गज राजकारणी एकत्र जमणार, तेव्हा कल्ला तर होणारच! यावेळी चटपटीत पदार्थांसोबत अनेक गोष्टी आणि किस्से देखील ऐकायला मिळाले. इतकंच नव्हे, तर या दरम्यान एक गंमतीशीर टास्क देखील झाला, ज्यात महापौर किशोरी पेडणेकर यांना अनेक दिग्गज नेत्यांची आठवण आली.

किशोरीताईंनी गोष्टींना दिली नेत्यांची नावं!

मंचावर एक खास टास्क आयोजित केला गेला होता. या टास्कमध्ये एक बॉक्स आणण्यात आला, ज्यात अनेक पदार्थ आणि वस्तू होत्या. टास्कनुसार किशोरी पेडणेकर यांना हे पदार्थ किंवा वस्तू पाहून कोणत्या नेत्याची आठवण आली, त्यांचे नाव घ्यायचे होते. यात पहिला पदार्थ होता ‘जिलेबी’. ‘जिलेबी पाहून किशोरी पेडणेकर यांना भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांची आठवण आली. यर, सुरी बाहेर येताच किशोरीताईंनी चटकन शिवसेना नेते संजय राऊत यांचं नाव घेतलं. यानंतर बॉक्समधून निघाला भोंगा. आता भोंगा पाहिल्यावर कुणाची आठवण येते म्हटल्यावर त्यांनी तडक भाजप नेते किरीट सोमय्या यांचं नाव घेतलं आणि संपूर्ण सेटवर हास्यकल्लोळ झाला.

भोंग्याने जाग येते सगळ्यांना!

भोंग्यासाठी किरीट सोमय्यांचं नाव घेतल्यानंतर पाठीमागे उभ्या असणाऱ्या भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील किशोरी पेडणेकरांना कोपरखळी मारली. ‘भोंग्याने जाग येते सगळ्यांना.. झोपू शकत नाही कुणी’, असं चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.

या खास भागात किशोर पेडणेकरांना खास सरप्राईज देखील मिळालं. या भागात त्यांच्या पतींनी देखील हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांचे आणि प्रेमात असतानाचे भन्नाट किस्से देखील प्रेक्षकांसोबत शेअर केले.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Sonu Sood on Chhath Puja: छटपूजेवरुन मुंबईतलं वातावरण तापलं, मनसे आक्रमक, पण जुहूतील छटपूजा उत्सवाला सोनू सूद येणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
छटपूजेवरुन मुंबईतलं वातावरण तापलं, मनसे आक्रमक, पण जुहूतील छटपूजा उत्सवाला सोनू सूद येणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Kavya Maran Marriage : ना सप्तपदी, ना पंडित, ना कोणते मंत्रोच्चार; 'या' विवाह पद्धतीत पार पडलं काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदरचं लग्न
ना सप्तपदी, ना पंडित, ना कोणते मंत्रोच्चार; 'या' विवाह पद्धतीत पार पडलं काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदरचं लग्न
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
Amitabh Bachchan : बच्चन कुटुंबासाठी चिंताजनक बातमी! अमिताभ बच्चन यांच्या जवळच्या व्यक्तीची प्रकृती बिघडली
बच्चन कुटुंबासाठी चिंताजनक बातमी! अमिताभ बच्चन यांच्या जवळच्या व्यक्तीची प्रकृती बिघडली

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate: सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्ब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्ब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
Chhagan Bhujbal on NCP Merger Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Indapur Protest :  नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; इंदापूरातील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर तीन तासांपासून रस्त्यारोको आंदोलन
नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; इंदापूरातील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर तीन तासांपासून रस्त्यारोको आंदोलन
CNG and PNG Prices Hike : खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर
खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर
Pune Missing Parrot Poster : पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Patil on NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणीकरणाबाबत रोहित पाटलांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, 'विलिनीकरण अथवा पाठिंबा याबाबत...'
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणीकरणाबाबत रोहित पाटलांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, 'विलिनीकरण अथवा पाठिंबा याबाबत...'
Embed widget