एक्स्प्लोर

Marathi Suspense Mystery Thriller Movie : थरारक दृश्य, गूढ वातावरण अन् दडलेली रहस्य; मिस्ट्रीनं भरलेला आगामी मराठी सिनेमा, टीझरमधला 50 सेकंदांचा थरार चक्रावतो

Marathi Suspense Mystery Thriller Movie : टीझरच्या 50व्या सेकंदाचा थरार पाहून तुम्ही स्क्रिनपासून दूर व्हाल. अंगावर काटा येईल. रहस्यांनी भरलेला 'असंभव' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Marathi Suspense Mystery Thriller Movie : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Industry) सस्पेंस, मिस्ट्री या जॅानरची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असून असाच एक रहस्यांनी भरलेला 'असंभव' (Asambhav Movie) हा चित्रपट येत्या 21 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये दिसणारी थरारक दृश्यं, गूढ वातावरण यामुळे हा चित्रपट रहस्यपट असल्याचा अंदाज येतोय. मात्र या सगळ्यामागे नक्की कोणतं रहस्य दडलं आहे? याचा उलगडा येत्या 21 नोव्हेंबरलाच होणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक सचित पाटील आणि पुष्कर सुधाकर श्रोत्री यांचं

मराठीतील नामंवत कलाकार सचित पाटील (Sachit Patil), मुक्ता बर्वे (Mukta Barve), प्रिया बापट (Priya Bapat) आणि संदीप कुलकर्णी (Sandeep Kulkarni) या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच एकत्र आले असून त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवण्याची संधी या चित्रपटात प्रेक्षकांना मिळणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण नैनीतालच्या गोठवणाऱ्या थंडीमध्ये करण्यात आलं असून नैनितालमध्ये चित्रीत झालेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटचे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक सचित पाटील आणि प्रथितयश निर्माते नितीन प्रकाश वैद्य पहिल्यांदाच चित्रपट निर्मितीसाठी एकत्र आले आहेत. तर एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर, संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत. 

दिग्दर्शक सचित पाटील आणि पुष्कर श्रोत्री म्हणतात, "असंभव’ ही अशी एक कथा आहे, जी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल. यात थरार आहे, भावना आहेत, प्रेमकहाणी आहे आणि गूढतेनं भरलेली रचना आहे. हा चित्रपट लोकांच्या मनात खोलवर उतरावा, यासाठी आम्ही प्रत्येक फ्रेमसाठी मेहनत घेतली आहे."

निर्माते नितीन प्रकाश वैद्य चित्रपटाबद्दल म्हणाले, "असंभव' या चित्रपटाची संहिता ऐकताक्षणी ती खूप सकस असल्याचं जाणवलं. कथा, पटकथा खूपच जबरदस्त असल्यानं या चित्रपटाची निर्मिती आपण एकत्र करूया, असा आग्रह मी सचितला केला. पुढे आमच्या या प्रवासात उत्तम सहनिर्माते आणि तितकेच उत्तम तंत्रज्ञ सहभागी झाले. चित्रपट बनवताना कोणतीही तडजोड केली नसून सगळ्याच तांत्रिक बाबींवर खूप बारकाईनं काम केलं आहे. त्यामुळे खूपच दर्जेदार चित्रपट तयार झाला आहे आणि प्रेक्षकांच्या तो नक्कीच पसंतीस उतरेल, याची आम्हाला खात्री आहे."

एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर म्हणतात, "असंभव' हा एक अतिशय दर्जेदार चित्रपट आहे आणि या चित्रपटाची सहनिर्मिती करण्याची आम्हाला संधी मिळाली, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला खात्री आहे, 'असंभव' नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल."

पाहा ट्रेलर :

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nawazuddin Siddiqui On Marathi Cinema: 'त्यांना स्थान नाही...'; मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीबाबत काय म्हणाला नवाजुद्दीन सिद्दिकी?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर

व्हिडीओ

Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : 19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Hasan Mushrif: दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
Aravali hills: हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
Embed widget