एक्स्प्लोर

Anandi Marathi Serial:'आनंदी ' मालिकेत रामनवमीचा हा एपिसोड चुकवू नका; अभिनेत्रीनं स्वतः गायलेलं भारूड ठरणार लक्षवेधी

या वेगळ्या धाटणीच्या मालिकेत आपल्याला एका अंध मुलीची कथा पाहायला मिळणार आहे. आता या मालिकेत रामनवमी निमित्त एक खास आणि रंगतदार भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Anandi Marathi Serial: स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘आनंदी’ मालिकेला (Anandi) प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. वेधक कथानक आणि प्रभावी व्यक्तिरेखांमुळे ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. (Marathi Seral) आता या मालिकेत रामनवमी निमित्त एक खास आणि रंगतदार भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, ज्यात ‘आनंदी’ भारुड सादर करताना दिसणार आहे. सोमवारी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला आणि प्रेक्षकांकडून या मालिकेवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.

रामनवमी विशेष भागात ‘आनंदी’ गाणार भारुड

या विशेष भागाची खासियत म्हणजे आनंदीची भूमिका साकारणाऱ्या जाई खांडेकरने (Jaaee Khandekar) हे भारुड स्वतः गायले आहे. संगीताचं कोणतंही औपचारिक शिक्षण नसतानाही जाईने हे आव्हान स्वीकारत अत्यंत मनापासून तयारी केली. सुप्रसिद्ध लोककलाकार चंदन कांबळे आणि त्यांचा मुलगा अभिषेक कांबळे यांच्या संकल्पनेतून हे भारुड साकारलं आहे. भारुड ही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील एक प्रेरणादायी आणि समृद्ध कला आहे. या कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करतानाच मनोरंजनही केलं जातं. जाईसाठी हे सादरीकरण केवळ अभिनयापुरतं मर्यादित नव्हतं, तर एक वेगळा आणि भावनिक अनुभव ठरला. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

प्रेक्षकांना मिळणार भावनिक -प्रेरणादायी अनुभव

या अनुभवाविषयी सांगताना जाई म्हणाली, ‘ भारुडाला न्याय देता येईल का याची सुरुवातीला भीती होती. पण चंदन कांबळे सरांनी इतकं सुंदर लिखाण केलं आहे की ते सादर करताना एक वेगळीच ऊर्जा मिळाली. जवळपास दोन आठवडे आम्ही या सादरीकरणासाठी मेहनत घेतली आणि प्रत्येक क्षण खूप काही शिकवणारा ठरला. या भारुडाच्या माध्यमातून ‘आनंदी’ मालिकेच्या कथानकाला एक महत्त्वाची कलाटणी मिळणार असून प्रेक्षकांना एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव मिळणार आहे. संपूर्ण टीमसाठीही हा भाग विशेष ठरला असून या सादरीकरणातून आम्हा सर्वांनाच नवी ऊर्जा मिळाली आहे. हे भारुड नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करेल असा विश्वास आहे. तेव्हा नक्की पाहा ‘आनंदी’ रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.  

'आनंदी' या मालिकेत तरुणी अपघातात दृष्टी गमावते.  तरीही ती आयु्ष्याकडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते. 'आनंदी'ला जरी आपल्या डोळ्यातून जग दिसत नसले तरीही, मनाने आणि संवेदनातून ती संपूर्ण जग अनुभवत असते. आनंदीचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या वेगळ्या धाटणीच्या मालिकेत आपल्याला एका अंध मुलीची कथा पाहायला मिळणार आहे.  या मालिकेतील 'आनंदी'चा साधेपणा हा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
TV Actor Arrest:16 वर्षीय मुलीचा छळ, मारहाण, पाठलाग अन्..; लोकप्रिय हिंदी टीव्ही अभिनेत्याला पॉस्को अंतर्गत अटक
16 वर्षीय मुलीचा छळ, मारहाण, पाठलाग अन्..; लोकप्रिय हिंदी टीव्ही अभिनेत्याला पॉस्को अंतर्गत अटक
'सैराट' फेम अरबाझ शेखच्या वडिलांच्या उपचारासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या सूचना; सोलापूरच्या मोठ्या हॉस्पिटलचा पुढाकार, नेमकं काय घडलं?
'सैराट' फेम अरबाझ शेखच्या वडिलांच्या उपचारासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या सूचना; सोलापूरच्या मोठ्या हॉस्पिटलचा पुढाकार, नेमकं काय घडलं?
OTT Action Thriller: 3 तास 7 मिनिटांच्या जबरदस्त ॲक्शन थ्रिलरचा Netflix वर धुमाकूळ; अवघ्या 24 तासांत नंबर-1 वर होतोय ट्रेंड, बॉक्स ऑफिसवरही  300 कोटींहून अधिक कमाई
3 तास 7 मिनिटांच्या जबरदस्त ॲक्शन थ्रिलरचा Netflix वर धुमाकूळ; अवघ्या 24 तासांत नंबर-1 वर होतोय ट्रेंड, बॉक्स ऑफिसवरही  300 कोटींहून अधिक कमाई

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Moshi Building Collapse: तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
Embed widget