Marathi Director On LGBTQ Community: 'लैंगिकता हा प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा खासगी भाग, ओळख नाही...'; मराठमोळ्या दिग्दर्शकानं मांडलं रोखठोक मत
Marathi Director On LGBTQ Community: लैंगिकता ही तुमची ओळख नसते, जसं माझी ओळख ही चित्रपट निर्माता आहे. कोणी स्ट्रेट माणूस जाऊन म्हणतो का मी स्ट्रेट आहे, असं मराठी दिग्दर्शक म्हणाला.

Marathi Director On LGBTQ Community: सध्या आगामी मराठी सिनेमाची (Marathi Film) मोठी चर्चा सुरू आहे, तो म्हणजे, 'साबर बोंडं'. रोहन कानवडे (Rohan Kanawade) दिग्दर्शित 'साबर बोंडं' (Directed By Sabar Bondan) या सिनेमात एका गे कपलची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. 19 सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. तेव्हापासूनच या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. ज्यावेळी LGBTQ समुदायावर (LGBTQ Community) आधारित किंवा अशा आशयाचे सिनेमे येतात, त्यावेळी या सिनेमात त्याच समुदायातील कलाकारांनी जर भूमिका साकारली तर...? ते या भूमिकांना न्याय देऊ शकतील का? अशा अनेक चर्चा रंगतात. नेमकं याच मुद्द्याला 'साबर बोंडं' सिनेमाचे दिग्दर्शक रोहन कानवडे यांनी हात घातला आहे. मला त्याच समुदायातील अभिनेते पाहिजे होते. ते शोधण्यात तीन वर्ष गेली, असं दिग्दर्शक रोहन कानवडे यांनी म्हटलं आहे.
दिग्दर्शक रोहन कानवडे नेमकं काय म्हणाले?
आगामी 'साबर बोंडं' सिनेमाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक रोहन कानवडे यांनी नुकतीच 'लोकसत्ता डिजिटल'ला मुलाखत दिली. "मला त्याच समुदायातील अभिनेते पाहिजे होते. ते शोधण्यात तीन वर्ष गेली. कशी पात्र पाहिजे आहेत हे मी स्क्रिप्टमध्ये लिहिलं होतं. पण मला चांगले अभिनेते मिळाले...", असं रोहन कानवडे यांनी म्हटलं आहे.
LGBTQ समुदायातीलच कलाकार घ्यायचे असं काही ठरलं होतं का? यावर बोलताना दिग्दर्शक रोहन कानवडे म्हणाले की, "मला तसं पूर्णपणे वाटत नाही. चित्रपटात जी पात्रं आहेत, ती कशी दिसावीत हे माझं ठरलं होतं. मला तो लूक पाहिजे होता. त्याबरोबरच माझ्यासाठी अभिनय सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे माझं मत असं नव्हतं की, LGBTQ समुदायातूनच कलाकार पाहिजेत वगैरे..."
"न्याय दिला पाहिजे म्हणजे नेमकं काय? मला ते दाखवायचंच नाही की, गे मुलं म्हणजे वेगळं काहीतरी करायचं आहे. मला नेहमी असं वाटतं की, लैंगिकता हा प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा खासगी भाग असतो. लैंगिकता ही तुमची ओळख नसते, जसं माझी ओळख ही चित्रपट निर्माता आहे. कोणी स्ट्रेट माणूस जाऊन म्हणतो का मी स्ट्रेट आहे. ती त्यांची ओळख नसते. मला चित्रपटात हे दाखवायचं आहे की दोन मुलं इतर पुरुषांप्रमाणेच तसेच नॉर्मल पुरुष आहेत.' असं रोहन यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























