एक्स्प्लोर

Urmila Kothare: भीषण अपघातानंतर उर्मिला कोठारेची पहिली पोस्ट; सांगितला त्या काळ्या रात्रीचा घटनाक्रम, म्हणाली, "रात्री 12.45 च्या सुमारास माझ्या गाडीचा…"

Urmila Kothare First Post After Accident : आज तिने तिच्या चाहत्यांना याबाबतची माहिती देत सोशल मिडियावरती एक फोटोसह एक पोस्ट शेअर करत, घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिला आहे.

Urmila Kothare First Post After Accident : लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या (Urmila Kothare) कारचा 28 डिसेंबर रोजी भीषण अपघात (Car Accident) झाला होता. मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ हा अपघात (Car Accident) झाला होता. उर्मिला कोठारे शूटिंग संपवून घरी परतत असताना ही घटना घडलेली होती. या अपघातामध्ये अभिनेत्री उर्मिला कोठारे देखील गंभीर जखमी झाली होती. अपघातानंतर तातडीने तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आता उर्मिला कोठारे (Urmila Kothare) ठणठणीत होऊन रुग्णालयातून घरी परतली आहे, आज तिने तिच्या चाहत्यांना याबाबतची माहिती देत सोशल मिडियावरती एक फोटोसह एक पोस्ट शेअर करत, घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिला आहे. तसेच उर्मिलाने देवाचेही आणि पोलिसांचे देखील आभार मानले आहेत.

उर्मिला कोठारेनी काय म्हटलं आहे पोस्टमध्ये

आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये उर्मिला कोठारेने (Urmila Kothare) त्या दिवशी नेमकं काय घडलं, अपघात (Car Accident) कसा झाला? याबाबतची माहिती दिली आहे. 28 डिसेंबर 2024 रोजी, रात्री 12.45 वाजण्याच्या सुमारास माझ्या गाडीचा भीषण अपघात (Car Accident) झाला. कांदिवली पोईसर मेट्रो स्टेशन परिसरातमध्ये, पश्चिम द्रुतगती महामार्गावर मेट्रोचं काम सुरू असताना मोठी यंत्र, सामान आणि जेसीबी लोडर/एक्सकॅव्हेटर वाहने उभी केलेली होती. माझा ड्रायव्हर कार चालवत होता. त्यावेळी अचानक वळण आलं, त्यामुळे हा दुर्दैवी अपघात (Car Accident) झाला. या कारच्या धडकेनंतर मी आणि माझा ड्रायव्हर गंभीर जखमी झालो आणि बेशुद्ध पडलो. सुदैवाने, आम्हाला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं, अशी माहिती तीने आपल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे.

माझ्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार 

पुढे उर्मिला कोठारे लिहते, 'मुंबई पोलीस आणि डिलिव्हरी कर्मचारी पवन शिंदे यांचे आभार मानते, त्यांनी तात्काळ आम्हाला मदत केली आणि आम्हाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं. आता मी माझ्या घरी आहे. माझ्या पाठीला आणि बरगड्यांना अद्याप त्रास होत आहे, दुखापत आहे. थोडा त्रास होत आहे. यामुळेच डॉक्टरांनी मला किमान 4 आठवडे कोणताही शारीरिक व्यायाम न करण्याचा सल्ला दिला आहे. माझ्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे मी आभार मानतो. ज्यांनी माझ्या प्रकृतीसाठी आणि मी लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली. हा एक भीषण अपघात होता आणि यामुळेच पोलिसांनी माझ्या ड्रायव्हरविरोधात एफआयआर नोंदवला आहे. मला आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला माहित आहे की न्याय मिळेल', असं उर्मिलाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 चाहत्यांनी दिला काळजी घेण्याचा सल्ला 

दरम्यान, उर्मिलाच्या या पोस्टवरती अनेक कलाकारांनी, तिच्या जवळच्यांनी, तिच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर कमेंट्स करत तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 17 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 17 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Kareena Kapoor Khan Social Media Post: नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली,
नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली, "हा आमच्या सुरक्षेसाठी धोका, आम्हाला स्पेस द्या..."
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
Embed widget