एक्स्प्लोर

चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर, तत्पूर्वीच मराठी कलाकाराने जीवन संपवलं; सिनेसृष्टी हळहळली

marathi Actor death: काही दिवसांपूर्वीच त्याने या चित्रपटाचं पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केलं होतं, ज्यामुळे तो अतिशय उत्साहित असल्याचं दिसत होतं.

Marathi Actor Death: मराठी मनोरंजनसृष्टीतून पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या 25 व्या वर्षी मराठी अभेनेत्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. अभिनेता सचिन चांदवडे (Sachin Chandavade) याने  23 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केल्याचं उघडकीस आल्यानंतर मराठी कलाविश्वात खळबळ उडालीय. महत्वाची भूमिका असणारा त्याचा चित्रपट 'असुरवन' नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. त्याआधीच त्याने असे टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होतेय.

अभिनेता  सचिन चांदवडे याने जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातल्या उंदिरखेडे गावात त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. त्याच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

नेमके घडले काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सचिनने घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत पंख्याला गळफास घेतल्याचे समजते. त्यानंतर तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृती गंभीर झाल्याने त्याला पुढे धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सचिन चांदवडे हा मूळचा इंजिनिअर असून पुण्यातील आयटी पार्कमध्ये नोकरी करत होता. मात्र, अभिनयाची आवड असल्यामुळे त्याने नोकरीसोबतच अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं होतं. महत्वाची भूमिका असणारा सचिनचा सिनेमा ‘असुरवन’ लवकरच प्रदर्शित होणार होता. काही दिवसांपूर्वीच त्याने या चित्रपटाचं पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केलं होतं, यात तो अतिशय उत्साहित असल्याचं दिसत होतं.

View this post on Instagram
 
A post shared by CINEGOSSIPS (@cinegossips)

सहकलाकारांनी व्यक्त केल्या भावना 

फक्त एवढंच नाही, तर सचिनने नेटफ्लिक्सवरील ‘जमतारा 2 ’ या लोकप्रिय सीरिजमध्येही झळकून आपली वेगळी छाप सोडली होती. तसेच गणेशोत्सव, गुढीपाडवा अशा सणांच्या वेळी अनेक प्रसिद्ध मराठी कलाकारांसोबत ढोलवादनाचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते.अवघ्या 25व्या वर्षी सचिनसारख्या तरुण आणि प्रतिभावान कलाकाराने आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार, त्याचे मित्र आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरून भावनिक श्रद्धांजली वाहत त्याला आठवलं आहे. कलाकंद प्रोडक्शन हाऊसनेही त्यांच्या अधिकृत पेजवर पोस्ट शेअर करत लिहिलं, “आमचा असुरवनचा नायक आता आमच्यात नाही, पण त्याचा अभिनय कायम स्मरणात राहील.”

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'मला वाटतं तू नक्की सिंगल आणि व्हर्जिन नाहीस' अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, विद्यापीठातील तीन प्राध्यापक निलंबित, व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
'मला वाटतं तू नक्की सिंगल आणि व्हर्जिन नाहीस' अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, विद्यापीठातील तीन प्राध्यापक निलंबित, व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट होता; आमदाराच्या स्वीय सहायकाचा ICU मधून खळबळजनक दावा
अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट होता; आमदाराच्या स्वीय सहायकाचा ICU मधून खळबळजनक दावा
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
Devendra Fadnavis: तपोवनातील वृक्षतोडीबाबत देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक वक्तव्य, म्हणाले, '10 वर्षांपूर्वीच्या गुगल इमेजमध्ये झाडं नव्हती'
तपोवनातील वृक्षतोडीबाबत देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक वक्तव्य, म्हणाले, '10 वर्षांपूर्वीच्या गुगल इमेजमध्ये झाडं नव्हती'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट
Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?
Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मला वाटतं तू नक्की सिंगल आणि व्हर्जिन नाहीस' अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, विद्यापीठातील तीन प्राध्यापक निलंबित, व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
'मला वाटतं तू नक्की सिंगल आणि व्हर्जिन नाहीस' अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, विद्यापीठातील तीन प्राध्यापक निलंबित, व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट होता; आमदाराच्या स्वीय सहायकाचा ICU मधून खळबळजनक दावा
अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट होता; आमदाराच्या स्वीय सहायकाचा ICU मधून खळबळजनक दावा
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
Devendra Fadnavis: तपोवनातील वृक्षतोडीबाबत देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक वक्तव्य, म्हणाले, '10 वर्षांपूर्वीच्या गुगल इमेजमध्ये झाडं नव्हती'
तपोवनातील वृक्षतोडीबाबत देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक वक्तव्य, म्हणाले, '10 वर्षांपूर्वीच्या गुगल इमेजमध्ये झाडं नव्हती'
IND vs SA 2nd ODI LIVE Score : सलग 3 चौकार, पण पाचव्या चेंडूवर रोहित शर्माचा घात! इतक्या धावा करून हिटमॅन OUT, जाणून घ्या अपडेट्स
IND vs SA LIVE : सलग 3 चौकार, पण पाचव्या चेंडूवर रोहित शर्माचा घात! इतक्या धावा करून हिटमॅन OUT, जाणून घ्या अपडेट्स
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
Jay Pawar Rutuja Patil wedding: जय पवारांचा बहारीनमध्ये ग्रँड विवाहसोहळा, संगीत-मेंहदीच्या कार्यक्रमाला खास ड्रेस कोड, फक्त 400 जणांना निमंत्रण
जय पवारांचा बहारीनमध्ये ग्रँड विवाहसोहळा, संगीत-मेंहदीच्या कार्यक्रमाला खास ड्रेस कोड, फक्त 400 जणांना निमंत्रण
Embed widget