एक्स्प्लोर

Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Movie : अंतरवालीत लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला? "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" चित्रपटात समोर येणार सत्य?

Maratha Reservation Protest : अंतरवाली सराटीमधील उपोषण आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा जोमाने पेटले. "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" चित्रपटात या लाठीचार्जचे चित्रण आहे. या लाठीचार्जचा आदेश कोणी दिला, याचा दावा चित्रपटातून होण्याची शक्यता आहे.

Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Movie :    मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" ( Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil ) चित्रपट पु्न्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज लाँच करण्यात आला. अंतरवाली सराटीमधील उपोषण आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा जोमाने पेटले. "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील"  चित्रपटात या लाठीचार्जचे चित्रण आहे. या लाठीचार्जचा आदेश कोणी दिला, याचा दावा चित्रपटातून होण्याची शक्यता आहे. 

मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरमुळे  चित्रपटाविषयी आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मराठ्यांचं वादळ धडकणार चित्रपटसृष्टीत घडवणार नवा इतिहास ,अभी नही तो कभी नही, मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांची जीवनकहाणी असलेला "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" हा चित्रपट आता 14 जून 2024 ला प्रदर्शित होत आहे. अख्खा महाराष्ट्र या चित्रपटाच्या टीमने प्रमोशनसाठी पिंजून काढला असून रसिक प्रेक्षकांकडूनही या चित्रपटला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" या चित्रपटातून घेतला जाणार आहे. 

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मागील काही वर्षांपासून आंदोलन केले.  धरणे आंदोलनापासून विविध मार्गाने मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठीचा लढा उभारला. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी उपोषण आंदोलन सुरू केले. या उपोषण आंदोलनावर  पोलिसांचा लाठीचार्ज झाला. गोळीबारही करण्यात आला. या घटनेचे राज्यात मोठे पडसाद उमटले. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लाठीचार्जचे दृष्य दाखवण्यात आले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आहे. 

धारदार संवाद...

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये धारदार संवाद असल्याचे दिसले आहे.  लाठीचार्ज आणि गोळीबाराचा आदेश कोणी दिला? हे देशाला समजलेच पाहिजे, मराठ्यांना आरक्षण तात्काळ जाहीर झालेच पाहिजे एवढच आम्हाला समजतं यासह शिवाजी महाराजांचा मावळा आहे मी ! तलवारबाज मावळ्याच्या घोड्याचा अन कुणब्याच्या बैलजोड्याचा नाद करायचा नाही! यासारखे संवाद आहेत. 

चित्रपटात कोणते कलाकार?

या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेते मोहन जोशी,  संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे,  माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे, श्रीकृष्ण शिंगणे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, विठ्ठल अर्जुन पचपिंड ,जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे पाटील, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. 

पाहा ट्रेलर : Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil - Trailer | Rohan Patil | Shhivaji Doltade | 14th June 2024

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Embed widget