Manish Chaudhari Shruti Mishra Love Story: 17 वर्षांनी लहान तरुणीसोबत अभिनेता बोहोल्यावर, कुटुंबाचा लग्नाला विरोध; समजूत घालण्यातच दोन वर्ष वाया
Manish Chaudhari Shruti Mishra Love Story: दोघांच्या वयात 17 वर्षांचा फरक आहे. मनीष चौधरी यांना त्यांच्या वयातील अंतराचा काहीच फरक पडला नाही, पण श्रुतीला घरच्यांना त्यांचं नातं पटवून द्यायला तब्बल दोन वर्ष लागली. अखेर घरच्यांच्या परवानगीनं जोडप्यानं 2023 मध्ये लग्न केलं.

Manish Chaudhari Shruti Mishra Love Story: मनीष चौधरी (Manish Chaudhari) अलिकडेच आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' (Bads Of Bollywood) सीरिजमध्ये दिसलेले. फ्रेडी सोडावाला या त्यांनी साकारलेल्या भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मनीष चौधरी 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. अलिकडेच त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत मनीष आणि त्यांची पत्नी श्रुती मिश्रानं त्यांच्या समजाच्या सर्व चौकटी मोडणाऱ्या लव्ह स्टोरीचा खुलासा केला. दोघांच्या वयात 17 वर्षांचा फरक आहे. मनीष चौधरी यांना त्यांच्या वयातील अंतराचा काहीच फरक पडला नाही, पण श्रुतीला घरच्यांना त्यांचं नातं पटवून द्यायला तब्बल दोन वर्ष लागली. अखेर घरच्यांच्या परवानगीनं जोडप्यानं 2023 मध्ये लग्न केलं.
पत्नीपेक्षा 17 वर्षांनी मोठा आहे अभिनेता
हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत बोलताना श्रुतीनं मनीष चौधरी यांच्यासोबतच्या आपल्या पहिल्या भेटीबाबत सांगितलं. दोघेही एका थिएटरमध्ये भेटलेले. ते म्हणाले की, "मी खूप खूश होतो की, मला मुंबईत कुणी असं मिळालंय, जे माझ्यासारखाच विचार करत होतं... सुरुवातीपासून मी खूपदा आय लव्ह यू म्हणायचे, पण मनीषला मला हे म्हणायला थोडा वेळ लागला..."
View this post on Instagram
दोघांच्या वयातील फरकाबद्दल बोलताना श्रुती म्हणाली की, "आमच्यात 17 वर्षांचं अंतर आहे. मला वाटतं जेव्हा मी त्याला विचारलं, 'तुमचं वय किती आहे?' त्यांनी मला लगेच सांगितलं. त्यावर मी आश्चर्यचकीत होऊन म्हणालेले, 'खरंच?' मला माहीत होतं की, आमच्या वयात खूप मोठा फरक आहे, पण मला माहीत नव्हतं की किती? मनीष म्हणालेला, 'वयाचा मला कधीच त्रास झाला नाही..."
श्रुती मिश्रा म्हणाली की, वयाचा फरक असूनही, तिला माहीत होतं की, ते बराच काळ एकत्र राहतील. ती म्हणाली, "मला वाटतं मनीष आणि माझ्यात झालेल्या पहिल्या संभाषणांपैकी एक म्हणजे, 'ऐक, मला वयाच्या फरकाबद्दल माहिती नाही. पण मला वाटतं की, आपण खूप काळ एकत्र राहणार आहोत, आणि मला वयाच्या फरकाची पर्वा नाही. तुला माझ्यापेक्षा जास्त काळ जगायचंय कारण मी तुझ्याशिवाय एक दिवसही जगू शकत नाही, म्हणून मी आधी जाईन आणि तू राहशील."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























