![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Malaika Arora : वयाची पन्नाशी गाठलेली मलायका स्कर्ट-टॉप घालून येताच कमेंटचा पाऊस
Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे (Malaika Arora) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मलायका नुकतीच मुंबईतील (Mumbai) माऊंट मेरी चर्चमध्ये दाखल झाली होती. दरम्यान, चर्चजवळील (Church) तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
![Malaika Arora : वयाची पन्नाशी गाठलेली मलायका स्कर्ट-टॉप घालून येताच कमेंटचा पाऊस Malaika Arora malaika arora spotted at mount mary church netizens comments on actress photos Marathi News Malaika Arora : वयाची पन्नाशी गाठलेली मलायका स्कर्ट-टॉप घालून येताच कमेंटचा पाऊस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/31/672c7f9acb3756938200455db345dec71706703259338924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे (Malaika Arora) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मलायका नुकतीच मुंबईतील (Mumbai) माऊंट मेरी चर्चमध्ये दाखल झाली होती. दरम्यान, चर्चजवळील (Church) तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. यावेळी मलायकाने लाल रंगाची स्कर्ट आणि टॉप परिधान केला होता. तिच्या चाहत्यांना हा लूक फारच आवडलाय. मलायकाच्या (Malaika Arora) सौंदर्यावर आणि फिटनेसवर चाहते घायाळ झाले आहेत. मलायकच्या नव्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
प्रार्थना करण्यासाठी चर्चमध्ये पोहोचली होती मलायका
मलायका अरोरा मंगळवारी (दि.30) पुन्हा एकदा मुंबईत स्पॉट झाली. मलायका चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी आली होती. मुंबईत माऊंट मेरी चर्च आहे. तेथे ती प्रार्थनेसाठी दाखल झाली होती. दरम्यान, मलायकला पाहताच पापाराझींनी फोटो काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिचे फोोट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
सोशल मीडियावरुन कमेंट्सचा वर्षाव
मलायकाचा चर्चमधील ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना आवडलाय. त्यांनी सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिच्या चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी मलायकाच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
मलायकाच्या वयाचा उल्लेख
मलायकाच्या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये अनेकांनी तिच्या वयाचा उल्लेख केला आहे. एका चाहत्याने लिहिले की, "वयाची पन्नाशी ओलांडली तरी मलायका किती सुंदर दिसत आहे." मात्र, काही वेळेस मलायकला सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.
मलायकाच्या ग्लॅमरस अंदाजाने वेधलं लक्ष
चर्चमध्ये पोहोचल्यानंतर मलायकाचा ग्लॅमरस अंदाज दिसून आला. यापूर्वीही मलायका अशाच अंदाजात स्पॉट झाली आहे. तिचे सौदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत. शिवाय मलायकाच्या फिटनेसबाबतही जोरदार चर्चा सुरु आहे. मलायका तिच्या फिटनेसवर देखील काम करते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती जीम आणि योगा देखील करते.
मलायका सध्या अर्जुन कपूरला करतेय डेट
अभिनेता अरबाज खान यांच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. अर्जुन कपूरसोबत ती अनेकदा स्पॉट देखील झाली आहे. अरबाजने दुसरा विवाह केल्यानंतर आता मलायका देखील अर्जुन सोबत विवाह करणार असल्याची चर्चा आहे. मी पुन्हा एकदा संसार थाटणार असल्याचेही मलायकाने स्पष्ट केले आहे.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)