Malaika Arora : अपघातानंतर कशी आहे मलायकाची तब्येत? बहिण अमृता म्हणाली...
मलायकाची (Malaika Arora) बहिण अमृता आरोरा (Amrita arora) नं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मलायच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे.
![Malaika Arora : अपघातानंतर कशी आहे मलायकाची तब्येत? बहिण अमृता म्हणाली... malaika arora health update after car accident will be discharged soon sister Amrita arora give information Malaika Arora : अपघातानंतर कशी आहे मलायकाची तब्येत? बहिण अमृता म्हणाली...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/03/d1bb83954e30139eaac8cedb74be429f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या (Malaika Arora) गाडीचा काल (2 एप्रिल) मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर खोपोलीनजीक बोरघाटात अपघात झाला आहे. तिच्यावर मुंबईमधील ओपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रिपोर्टनुसार, मलायकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. मलायकाची बहिण अमृता आरोरा (Amrita arora) नं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मलायच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे.
मुलाखतीमध्ये अमृतानं सांगितलं, 'मलायकाची तब्येत आता ठिक होत आहे. काही वेळ तिला अंडर ऑब्जरवेशन ठेवण्यात येणार आहे.' या आधी अपोलो हॉस्पिटलनं देखील मलायकाच्या हेल्थबाबात अपडेट दिली होती. त्यामध्ये त्यांनी सांगितले, 'मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. सीटी स्कॅन केल्यानंतर सर्व ठिक झाले. रात्रभर तिला अंडर ऑब्जरवेशनमध्ये ठेवण्यात आले. लवकरच तिला डिसचार्ज देण्यात येईल. '
View this post on Instagram
बोरघाटात पाच-सहा वाहने एकमेकांना धडकली. यात मलायका अरोराच्या कारचादेखील समावेश होता. राज ठाकरेंच्या सभेला जाणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मलायका अरोराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
हेही वाचा :
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला अपघात, रुग्णालयात दाखल
- Beast Trailer Release : विजय थलापतीच्या 'बीस्ट'चा ट्रेलर रिलीज, सिनेमात अॅक्शनचा तडका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)