Makarand Anaspure on Chhava : 'सध्याच्या काळात जातीपाती विसरुन...', छावा पाहिल्यानंतर मकरंद अनासपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Makarand Anaspure on Chhava :'सध्याच्या काळात जातीपाती विसरुन...', छावा पाहिल्यानंतर मकरंद अनासपुरेंची पहिली प्रतिक्रिया

Makarand Anaspure on Chhava : छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य आणि बलिदानावर आधारित अभिनेता विकी कौशलच्या 'छावा'या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर तब्बल 219.75 कोटींची कमाई केली आहे. मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात विकी कौशलने मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती असणाऱ्या संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर रश्मिका मंदानाने संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले असून दिनेश विजन यांनी निर्मिती केली आहे. दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा सिनेमा पाहिल्यानंतर मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी प्रतिक्रिया दिलीये.
मुलांना छावा हा सिनेमा आवर्जुन पाहण्यासाठी घेऊन जा - मकरंद अनासपुरे
मकरंद अनासपुरे म्हणाले, सध्याच्या काळात समाजाने जाती-पाती विसरुन एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी हा चित्रपट महत्त्वपूर्ण ठरेल, याची मला खात्री आहे. कारण आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जे करून ठेवलंय, त्याचं काय करायचं हा सर्वस्वी प्रश्न आपल्या सर्वांचा असणार आहे. छावा सिनेमा पाहिल्यानंतर मी माझ्या काही हिंदी भाषिक मित्रांच्या प्रतिक्रिया ऐकल्या आहेत. ते म्हणाले, की आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शाळेत का शिकवला गेला नाही? माझी महाराष्ट्रातील सर्व पालकांना विनंती आहे की, मुलांना छावा हा सिनेमा आवर्जुन पाहण्यासाठी घेऊन जा. कारण अलीकडच्या काळात इंग्रजी शाळांचं पेव फुटलेलं असताना आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या मातीविषयी, आपल्या वीरांविषयी सगळ्यांना माहिती असणं महत्त्वाचं आहे.
छत्रपती संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूरची लूट केल्यानंतर औरंगजेब सूडाने पेटला आणि दिल्ली सोडून तो दक्षिणेत चाल करुन आला, असं सिनेमात दाखवण्यात आलं आहे.. त्यानंतर संभाजी महाराजांनी मुघलांच्या सैन्याला जवळपास नऊ वर्ष झुंज दिली, असा सर्व ऐतिहासिक घटनाक्रम हा सिनेमात दाखवण्यात आलाय. मात्र, संभाजी राजांनी मुघलांना हैराण केलेलं असताना जवळच्या लोकांनीच औरंगजेबाला माहिती पुरवल्याने मराठ्यांचा घात झाला, असं सिनेमात दाखवण्यात आलंय. सिनेमात संभाजी महाराजाचं शौर्य आणि बलिदानावर भाष्य करणारा आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
