एक्स्प्लोर

Mahesh Manjarekar : क्रिएटीव्हली क्रिटीसाईज करा, पण आई, बायको,मुलीवरुन बोलाल तर शोधून काढून कानफटवेन; महेश मांजरेकरांचा ट्रोलर्सला सज्जड दम

Mahesh Manjarekar on Trollers : दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजेकर यांनी ट्रोलिंगवर दिलेल्या उत्तराने लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच त्यांनी यावेळी ट्रोलर्सना सज्जड दम देखील दिला आहे. 

Mahesh Manjarekar on Trollers : महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने महेश मांजेकरसह संपूर्ण जुनं फर्निचरच्या टीमने 'एबीपी माझाला' मुलाखत दिली. यावर महेश मांजरेकर यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. त्यातच त्यांनी ट्रोलिंग या मुद्द्यावरही त्यांचं स्पष्ट मत मांडलं. 

कलाकारांच्या आयुष्यात ट्रोलिंग हा विषय काही नवा नाही. जितकं कलाकारांना त्यांच्या कामावरुन ट्रोल केलं जातं तितकच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही ट्रोल केलं जातं. नुकतच अभिनेता चिन्मय मांडलेकरच्या लेकाला त्याच्या नावावरुन ट्रोल करण्यात आलं होतं. या सगळ्यावर महेश मांजेकर यांच्या उत्तरानं सगळ्यांचचं लक्ष वेधून घेतलं. 

महेश मांजरेकरांनी नेमकं काय म्हटलं?

एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये महेश मांजरेकरांनी म्हटलं की, 'मला या गोष्टीचा भयंकर राग येतो. राग हा यायलाच हवा. लोकं म्हणतात दुर्लक्ष करा. का दुर्लक्ष करायचं. कोणी हक्क दिला तुम्हाला. मी काही तुमच्याबद्दल वैयक्तिक बोललो आहे का? मी एक सिनेमा बनवतो. तो तुम्ही बघितला, तुम्ही पैसे टाकले त्याच्यासाठी, तुम्हाला हक्का आहे सांगायचा की मला सिनेमा नाही आवडला. माझे पैसे फुकट गेले किंवा मला आवडला माझे पैसे वसूल झाले. तुम्ही मला क्रिएटीव्हली क्रिटीसाईज केलंत तर माझं काहीही म्हणणं नाही. कारण तुम्ही माझे प्रेक्षक आहात आणि मी तुमच्या आवडीचा आदर करतो. मी एखादी पोस्ट केली की माझी आई, वडिल, माझी मुलगी, बायकोला बोलायचा हक्क देत नाही कोणाला.मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन.' 

यासाठी एक कायदा हवा - महेश मांजरेकर

पुढे महेश मांजरेकरांनी यासाठी एक कायदा असावा अशी देखील मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं की, 'तुम्ही माझ्या कामावर बोला पण दरवेळी माझ्या आईला का बोलता तुम्ही. मी तुम्हाला वैयक्तिक काही म्हणालो आहे का? एकदा तर माझ्या मुलीबद्दल मी इतकं भीषण काहीतरी लिहिलं होतं मी शोधलं त्याला आणि तक्रार केली. का माफ करावं अश्यांना. पण हे कधी संपेल जेव्हा सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट करण्यासाठी एक कायदा तयार केला जाईल, तेव्हा हे सगळं लगेच संपेल.' 

महेश मांजरेकरांनी त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावर एका व्यक्तीने अत्यंत अश्लील भाषेत कमेंट केली होती. त्याला महेश मांजरेकरांनी सणसणीत उत्तर देखील दिलं. पण त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांनी पोलिसांत तक्रार देखील नोंदवली होती. 

ही बातमी वाचा : 

Juna Furniture : आई-वडिलांना गृहित धरणाऱ्यांनी पाहावा असा 'जुनं फर्निचर'; महेश मांजरेकर म्हणतात...

VIDEO Juna Furniture: पोटच्या मुलाला कोर्टात खेचणाऱ्या बापाची गोष्ट! ...म्हणून सिनेमाचं नाव 'जुनं फर्निचर'

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Embed widget