Madhurani Prabhulkar Exit From Mi Savitribai Jyotirao Phule Serial: 'मी सावित्रीबाई..' मालिकेतून मधुराणी प्रभुलकर यांची एक्झिट! 'ही' लोकप्रिय अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
प्रोमोमध्ये मधुराणी यांच्या जागी नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे ही नवी अभिनेत्री कोण? मधुराणी प्रभुलकर कुठे गेल्या ? असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय.

Madhurani Prabhulkar Exit From Savitribai Jyotirao Phule Marathi Serial: स्टार प्रवाह वाहिनीने 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' (Mi savitribai Jyotirao Phule) ही मालिका TRPचं कारण देत बंद केली. आजपासून ही मालिका youtube वर प्रसारित केली जाणार आहे. केवळ 152 भागांमध्ये गुंडाळलेली ही मालिका सुरू राहावी यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी 'मालिका संपली असली तरी गोष्ट सुरू राहणार' अशी घोषणा केली होती. दरम्यान, या मालिकेच्या पुढच्या प्रवासाचा एक प्रोमो त्यांनी youtube चॅनलवर शेअर केला होता. मात्र, हा प्रोमो बघून, प्रेक्षकांना आणखी एक धक्का बसला आहे. मालिका वाहिनीवरून काढून टाकल्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) यांनी youtube वर प्रसारित होणाऱ्या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. प्रोमोमध्ये मधुराणी यांच्या जागी नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे ही नवी अभिनेत्री कोण? मधुराणी प्रभुलकर कुठे गेल्या ? असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय.
'मी सावित्रीबाई ..' मालिकेतून मधुराणी प्रभुलकर यांची एक्झिट
स्टार प्रवाह वाहिनीने मालिका बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांनी मालिका युट्युबवर सुरू होणार असल्याचं सांगितलं. पण आता युट्युब वरील मालिकेत मधुराणी प्रभुलकर दिसणार नाही. मधुराणी यांच्या जागी अभिनेत्री क्षमा देशपांडे सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. खरंतर,मालिका संपण्यापूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये ते सर्व कलाकार, तंत्रज्ञ पडद्यामागील कलाकार यांच्याशी संवाद साधताना दिसले होते. कोणताही कलाकाराचं मानधन कमी होणार नाही. याची जबाबदारी माझी ' असं डॉ अमोल कोल्हे म्हणाले होते. मालिकेचं ऐतिहासिक मूल्य जपण्यासाठी ही मालिका पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.अनेक कलाकारांनी त्यांचे निर्णयाला साथ दिली. दरम्यान youtube वर प्रसारित होणाऱ्या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आल्यानंतर चाहत्यांना सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत मधुराणी प्रभूलकर दिसल्याच नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसलाय. त्यांच्या जागी अभिनेत्री क्षमा देशपांडे या भूमिकेत दिसणार आहेत.
View this post on Instagram
कोण आहे अभिनेत्री क्षमा देशपांडे ?
मराठी TV मनोरंजनसृष्टीत, 'लग्नानंतर होईलच प्रेम ', इंद्रायणी, 'उदे ग अंबे उदे' अशा मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री क्षमा देशपांडे काही दिवसांपूर्वी 'लग्नानंतर होईलच प्रेम ' या मालिकेतून एक्झिट घेतल्यामुळे चर्चेत होती. सोशल मीडियावर तिने मालिकेच्या शूटिंगचा व्हिडिओ ही शेअर केलेला. दरम्यान आता क्षमा कोणत्या नव्या भूमिकेत दिसते याकडे चाहते आतुरतेने पाहत होते. आता सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत ती दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















