Amitabh Bachchan-Rekha Love Story: अमिताभ-रेखा यांनी लग्न केलं का? दबक्या आवाजात सुरू होत्या चर्चा, 22 जानेवारी 1980च्या 'त्या' रात्री काय घडलं?
Amitabh Bachchan-Rekha Love Story: बॉलीवूडच्या इतिहासात कोणत्याही कलाकाराची प्रेमकहाणी कायम स्मरणात राहणार असेल तर ती रेखा यांची आहे. एकेकाळी या ज्येष्ठ अभिनेत्रीचे अमिताभ बच्चन यांच्यावर खूप प्रेम होते.

Amitabh Bachchan-Rekha Love Story: चित्रपटसृष्टीत मोठा काळ गाजवलेली अभिनेत्री रेखा (Rekha) आणि अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची लव्हस्टोरी कोणापासून लपलेली नाही. अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन यांनाही या दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल माहिती असल्याचं बोलले जाते. रेखा आणि अमिताभ यांची प्रेमकहाणी अपूर्ण राहिली, पण त्याची चर्चा नेहमीच होताना दिसते. अनेकदा रेखा मुलाखतींमध्ये आपल्या मनातलं बोलतात. अमिताभ बच्चन यांच्या लग्नानंतरही रेखाचे नाव अभिनेत्याशी जोडले जात होते. खुद्द रेखाही अनेक वेळा आपल्या वागण्यांमधून, बोलण्यातून त्यांचं प्रेम व्यक्त करताना दिसल्या. मात्र, रेखासोबतच्या अफेअरच्या अफवांवर अमिताभ बच्चन यांनी कधीही मौन सोडले नाही.
अमिताभ बच्चन यांनी त्यांचे नाते जगासमोर आणावे अशी रेखा यांची इच्छा होती, असं म्हटलं जातं. मात्र, असं कधीच घडलं नाही आणि पुढे काय झालं हे समजल्यानंतर अनेकांना धक्का बसला. अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात वेडी झालेल्या रेखाने असे काही केले ज्यानंतर अभिनेत्री आणि बिग बी यांनी गुपचूप लग्न केल्याचे बोलले जात होते. मात्र, सत्य काय होते, हे फक्त रेखा किंवा अमिताभ बच्चन यांनाच माहीत आहे.
त्या रात्री काय घडलं?
खरंतर, 22 जानेवारी 1980 हा दिवस होता, जेव्हा ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांचे लग्न झाले होते. या दिवशी सर्वांचे लक्ष वधू-वराकडे असणं अपेक्षित होतं, पण, सर्वांच्यानजरा रेखांकडे रोखल्या गेल्या. ऋषी कपूर नीतू सिंह यांच्या लग्नात रेखा ज्या अवतारात पोहोचल्या होत्या. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या आणि फक्त त्यांच्यावरतीच रोखल्या. याचं कारण म्हणजे रेखा एखाद्या नव विवाहित महिलेप्रमाणे सिंदूर लावून फंक्शनला पोहोचल्या होत्या.
रेखाच्या कपाळावर सिंदूर लावलेले पाहून दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आणि रेखा आणि अमिताभ यांचे लग्न झाले का? यावर कुडबूज सुरू झाली. त्या रात्री रेखा यांच्या लूकचे फोटो अनेक मासिकांमध्ये प्रसिद्ध झाली होती. पण लग्न झाले की नाही हे गुपितच राहिले. मात्र, नंतर जेव्हा रेखाला केसांना सिंदूर लावण्याचे कारण विचारण्यात आले तेव्हा अभिनेत्रीने सांगितले की, फॅशन म्हणून त्या सिंदूर लावतात. त्यांनी अनेक वेळा सांगितले आहे की, त्या कोणत्याही व्यक्तीच्या नावाने सिंदूर लावत नाही.
अमिताभ बच्चन आणि रेखा यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री नेहमीच प्रेक्षकांना आकर्षित करत होती. मात्र, त्यांच्या व्यक्तिगत नात्याबद्दल अनेक अफवा होत्या. अमिताभ यांनी कधीही रेखाशी त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला नव्हता, तर रेखा नेहमीच त्यांच्यावर प्रेम व्यक्त करत राहिल्या. अनेकदा असे सांगितले जात होते की रेखा यांनी अमिताभ आणि जया यांच्या वैवाहिक जीवनात हस्तक्षेप केला होता, पण यासंदर्भात कधीही ठोस माहिती समोर आलेली नाही. जया यांनी अमिताभ यांना रेखा सोबत काम करायचं नाही असंही सांगितल्याच्या चर्चा होत्या, तरीही हे दोघे एकत्र काम करत राहिले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
