Marathi Actor : 'चला हवा येऊ द्या' फेम आणखी एक अभिनेता प्रचाराच्या मैदानात? शायना एनसींच्या रॅलीत झाला सहभागी
Marathi Actor : शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांच्या प्रचार रॅलीमध्ये चला हवा येऊ द्या फेम अभिनेता सहभागी झाला होता.
Kushal Badrike : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Assembly Election) पडघम वाजताच पक्षप्रवेश, जागावाटप, स्टार प्रचारक या सगळ्या गोष्टींची लगबग सुरु झाली. नुकतच 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu dya) फेम अभिनेता भाऊ कदम (Bhau Kadam) याने घडळ्याची निवड करत अजित पवारांसाठी स्टार प्रचारक होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चला हवा येऊ द्या फेम आणखी एका अभिनेता स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरला असल्याचं म्हटलं जातंय. अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांच्या रॅलीमध्ये सहभागी झाला होता.
भाजपमधून शिंदे गटात प्रवेश करत शायना एनसी यांनी मुंबादेवी मतदारसंघाचं तिकीट मिळवलं. त्यामुळे शायना एनसी आता धनुष्यबाण या चिन्हावर विधानसभेसाठी मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्याच प्रचार रॅलीमध्ये त्यांच्यासोबत अभिनेता कुशल बद्रिके देखील होता. त्यामुळे कुशलही आता प्रचाराच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय.
शायना एनसी यांनी शेअर केले फोटो
दरम्यान शायना एनसी यांनी कुशल सोबतचे फोटोही त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी म्हटलं की,मुंबादेवी-186 विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती शायना एन.सी.जी यांच्या प्रचार फेरीत अभिनेता कुशल बद्रिके यांच्यासह महायुतीचे नेते, कार्यकर्ते आणि असंख्य उत्साही लोकांचा उत्स्फूर्त सहभाग! एकजुटीचा संकल्प, उज्ज्वल भविष्याच्या दिशेने. २० नोव्हेंबरला धनुष्यबाणाला मतदान करून परिवर्तन घडवूया!
भाऊ कदम करणार अजित दादांचा प्रचार
लोकांना खळखळवून हसवणारे कॉमेडी किंग भाऊ कदम अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करताना दिसणार आहेत. सयाजी शिंदे यांच्यानंतर आणखी एक सेलिब्रिटी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रचारात दिसणार आहे. अजित पवारांची लाडकी बहीण योजना यासह विविध योजनांची माहिती भाऊ कदम प्रचार रॅलीत सहभागी होऊन सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणार असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राज्यभरात भाऊ कदम यांच्या प्रचार रॅलीच आयोजन केलं जाणार आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ