Kunal Kamra Case: कुणाल कामराची गुन्हे रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव, अटकेपासून संरक्षणासाठी अटकपूर्व जामिनाचा अर्ज द्या, कोर्टाची टिप्पणी
Kunal Kamra Case: कुणाल कामरानं उच्च न्यायालयात धाव घेतली असून खार पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, कुणाल कामराला अटकेपासून कोणताही तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे.

Kunal Kamra Case: राज्याचे उपमुख्यमंत्री (State Deputy CM) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर विडंबनात्मक गाणं गायल्यामुळे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या (Stand-up Comedian Kunal Kamra) अडचणींत वाढ झाली आहे. याप्रकरणी कुणाल कामरावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) वारंवार समन्स बजावल्यानंतरही कुणाल कामरा पोलीस चौकशीसाठी (Kunal Kamra Police Interrogation) उपस्थित राहिलेला नाही. अशातच या प्रकरणी कुणाल कामरानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई पोलिसांनी खार पोलीस ठाण्यात (Khar Police Station) वर्ग केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी याचिकेतून केली आहे. तातडीच्या सुनावणीची मागणीही कुणार कामराकडून करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वीही कुणाल कामरानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच, कुणाल कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलं होतं.
कुणाल कामरानं उच्च न्यायालयात धाव घेतली असून खार पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, कुणाल कामराला अटकेपासून कोणताही तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. तसेच, अटकेपासून दिलासा हवा असल्यास, अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करा, असे निर्देश हायकोर्टानं कुणाल कामराला दिले आहेत. कुणाल कामराच्या याचिकेवर उच्च न्यायालयात मंगळवारी (उद्या) सुनावणी पार पडणार आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी खार पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी कुणाल कामरानं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या व्यंगात्मक टिकेबद्दल कामराविरोधात राज्यभरात दाखल करण्यात आलेली सर्वच्या सर्व गुन्हे खार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले होते.
कुणाल कामराची विनंती मुंबई पोलिसांनी फेटाळली
कुणाल कामरानं मुंबई पोलिसांना पत्र लिहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याचं म्हणणं रेकॉर्ड करण्याची विनंती केली आहे. कुणाल कामरानं पत्र लिहून केलेली विनंती पोलिसांनी फेटाळली आहे. जिवाला धोका असल्यानं व्हिडीओ कॉलद्वारे जबाब नोंदवण्याची विनंती कुणाल कामरानं केली होती. पोलिसांनी कुणाल कामराची ही विनंती फेटाळत प्रत्यक्षात हजर राहण्याच्या सुचना केल्या होत्या. कुणाल कामराला 7 एप्रिलपर्यंत मद्रास हायकोर्टानं अंतरिम संरक्षण दिलं आहे. आज कुणालला देण्यात आलेल्या अंतरिम संरक्षणाची मुदत संपणार आहे. दरम्यान, मुंबई हायकोर्टात कुणाल कामरानं शनिवारी याचिका दाखल केलेली. मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























