सनई-चौघड्यांचे सूर घुमणार, दारी मांडव सजणार; 'लक्ष्मी निवास' फेम दिव्या पुगावकरची लगीनघाई, पाहा पत्रिकेची खास झलक!
Divya Pugaonkar Wedding Invatation : 'मुलगी झाली हो', 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री दिव्या पुगावकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
Divya Pugaonkar Wedding Invatation Viral : 2024 मध्ये रेश्मा शिंदे, शाल्व किंजवडेकर, किरण गायकवाड-वैष्णवी, निखिल राजेशिर्के अशा अनेक कलाकारांनी आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. अशातच आता नव्या वर्षातही मराठी सिनेसृष्टीत सनई-चौघड्यांचे सूर कानी पडणार आहेत. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीनं आपल्या लग्नपत्रिकेची खास झलक शेअर केली आहे.
नव्या वर्षात प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar) लग्नबंधनात अडकणार आहे. 'मुलगी झाली हो', 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकांमधून दिव्या पुगावकर घराघरांत पोहोचली. तिनं नुकतीच आपली लग्नपत्रिका शेअर केली असून लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दिव्याच्या इन्स्टा पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
दिव्याची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल
अभिनेत्री दिव्या पुगावकरनं इन्स्टा हँडलवर आपल्या लग्नपत्रिकेची एक झलक शेअर करुन आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. दिव्यानं नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत ती लवकरच लग्न करणार असल्याचं जाहीर केलं. दिव्यानं शेअर केलेल्या व्हिडीओवर 'अक्षय आणि दिव्या Save The Date' असं कॅप्शन देण्यात आलं आहे. पण, अभिनेत्रीनं यामध्ये कुठेही लग्न किती तारखेला होणार? याचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे कमेंट्समध्ये चाहत्यांकडून तारीख सांगा अशा कमेंट केल्या जात आहे. यामध्ये दिव्याच्या काही सहकलाकारांचाही समावेश आहे. 'मुलगी झाली हो' मालिकेत दिव्यासोबत ज्यानं स्क्रिन शेअर केली होती. त्या अभिनेता सिद्धार्थ खिरीडनं देखील 'तारीख सांग' अशी कमेंट केली आहे. दिव्यानं त्याच्या कमेंटला 'कॉलवर सांगते', असा रिप्लाय देखील दिला आहे.
View this post on Instagram
दिव्याचा होणारा नवरा कोण?
अभिनेत्री दिव्या पुरगावकर फिटनेस ट्रेनर आणि मॉडेल अक्षय घरत याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. या दोघांचा टिळ्याचा कार्यक्रम डिसेंबर महिन्यात पार पडला होता. यानंतर दिव्याच्या फोटोंवर लग्न कधी? लग्न कधी करणार? अशा अनेक कमेंट्स येत होत्या. त्यावेळी दिव्यानं "लवकरच लग्नाबद्दल खुलासा करेन", असं सांगितलं होतं. अखेर नव्या वर्षाच्या शुभेच्छांसोबतच अभिनेत्रीनं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं आणि चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :