Marathi Actor : भैय्यासाहेबांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, लागिरं झालं जी फेम अभिनेता 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात
Marathi Actor : लागिरं झालं जी फेम अभिनेता किरण गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
Kiran Gaikwad : अभिनेता किरण गायकवाडने (Kiran Gaikwad) नुकतच त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे. सोशल मीडियावर त्याने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबतचे (Vaishnavi Kalyankar) फोटो शेअर केले आणि त्यांचं लग्न ठरलं असल्याचीही घोषणा केली. त्यानंतर आता किरणने त्याच्या लग्नाचीही तारीख सांगितली आहे. किरण आणि वैष्णवी येत्या 14 डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहे.
किरणने नुकतच त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. किरणने त्याचा आणि वैष्णवीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांची तारीख जाहीर केलीये. त्यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
किरणने दिली होती प्रेमाची कबुली
किरणने काही दिवसांपूर्वी वैष्णवीसोबत फोटो शेअर करत म्हटलं होतं की, “तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस; पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायच ठरवलं आहे “मंत्रिमंडळल्या बैठका होत राहतील ,मंत्री पद वाटत राहतील ,त्यांचं ठरतय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो… ही आहे माझी होणारी “होम मिनिस्टर” !
दिग्दर्शक म्हणून पदार्पण
कसदार अभिनेता म्हणून किरण गायकवाडने आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने निवडलेल्या मालिका, चित्रपटांतून त्याचा अभिनेता म्हणून असलेला कल दिसतो. त्यामुळे आता दिग्दर्शक म्हणून पदार्पण करताना त्याने चित्रपटासाठी निवडलेला विषय काय, या बाबत कुतूहल आहे. त्याशिवाय "एफ.आय.आर. नंबर 469" या नावातून हे कथानक पोलीस तपासाचं असल्याचा अंदाज बांधता येत असला तरी विषय समजून घेण्यासाठी चित्रपटाचा ट्रेलर येईपर्यंत प्रेक्षकांना अजून थोडे थांबावं लागणार आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram