एक्स्प्लोर

Dr. Sejal Pawar : डॉ. सेजल पवारच्या अडचणीत वाढ, के.ई.एम. कडून मोठी कारवाई, 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं पण टांगती तलवार कायम

Sejal Pawar : डॉ. सेजल पवार हिच्यावर के.ई.एम. प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. तिला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं गेलं आहे.

KEM Hospital Sejal Pawar मुंबई : कॉमेडियन प्रणित मोरे याच्या कॉमेडी-शो दरम्यान मृतदेहाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या डॉ.सेजल पवार हिला पंधरा दिवस सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय के.ई.एम. प्रशासनानं घेतला आहे. या 15 दिवसांच्या दरम्यान सेजल पवारला कॉलेजमध्ये येण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे.  आज सेजल पवारच्या पालकांशी वरिष्ठांनी चर्चा केली असून त्यानंतर सेजल पवारला त्यांच्या ताब्यात सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

के.ई.एम. कडून समिती स्थापन

के.ई.एम. प्रशासनाकडून सेजल पवार प्रकरणात सखोल चौकशीची गरज असून त्यासाठी पाच सदस्य समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती आहे. सात दिवसात समिती आपला अहवाल सोपवणार त्यानंतर पुढील कारवाईची दिशा निश्चित केली जाईल. विद्यार्थिनी ही अद्याप वैद्यकीय शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी असल्याने तिच्याबाबतच्या सर्व बाबी नियम आणि मार्गदर्शक सूचनांनुसार हाताळल्या जातील, असेही प्रशासनाकडून स्पष्ट  करण्यात आलं आहे. डॉ. सेजल पवार हिला चौकशी समितीसमोर   तिची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

डॉ. सेजल पवार हिच्या व्हिडिओतील विधानांमुळे संस्थेच्या प्रतिमेवर झालेल्या परिणाम यासाठीची तपासणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पाच सदस्यांच्या समितीत वरिष्ठ प्राध्यापकांसह बाह्य सदस्यांचाही समावेश असणार आहे.  या समितीच्या कार्यकक्षेत कोणत्या मुद्द्यांचा समावेश करायचा याबाबत अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर चौकशीला सुरुवात होईल. 

प्राथमिक अहवालात काही आरोपांबाबत तथ्ये समोर आली असली, तरी सर्व बाबींची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याने विस्तृत समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. सोशल मीडियावरील प्रसिद्धी, विद्यार्थिनीचे वर्तन, संस्थेची प्रतिमा आणि संबंधित तक्रारी या सर्व बाबींचा चौकशीत समावेश असणार आहे.

डॉ. सेजल पवार 15 दिवस सक्तीच्या रजेवर

डॉ. सेजल पवार हिला के.ई.एम. प्रशासनानं15 दिवसांसाठी कॉलेजमध्ये येण्यापासून मज्जाव केला आहे. तिला या कालावधीत कॉलेजमध्ये येता येणार नाही, क्लासेसला हजर राहता येणार नाही.  आज सेजल पवारला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात सोपवण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. सेजल पवारला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.

कॉमेडी शो दरम्यान मृतदेहासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या डॉ. सेजल पवारने KEM रुग्णालय प्रशासनाकडे लेखी माफीनामा सादर केला होता.डॉ. सेजल पवार हिने मागील वर्षी इन्स्टाग्राम रीलमध्ये केईएम रुग्णालयाला चिंदी कॉलेज म्हणत केईएम महाविद्यालयाचा अवमान केला होता. या प्रकरणी तिने माफी मागितली होती.त्यानंतर तिच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही त्यानंतर पुन्हा एकदा प्रणित मोरेच्या शोमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर तिच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती.

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
Nauheed Cyrusi on Miscarriages: 'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
Amol Kolhe On Savitribai Jyotiba Phule Serial: TV वरुन गाशा गुंडाळला, पण युट्यूबर येताच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं; 'सावित्रीबाई जोतीराव फुले'बाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
'टीआरपीपेक्षा प्रेक्षकांचं प्रेम महत्त्वाचं...'; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
Devoleena Bhattacharjee: पुराच्या पाण्यात अडकली आई, आजी-मावशीचं घर बुडालं; निसर्गाचा विध्वंस पाहून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला रडू कोसळलं
पुराच्या पाण्यात अडकली आई, आजी-मावशीचं घर बुडालं; निसर्गाचा विध्वंस पाहून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला रडू कोसळलं
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Embed widget