एक्स्प्लोर

SRH Owner Kavya Maran Marrying Anirudh Ravichander: काव्या मारन होणार थलायवी रजनिकांत यांची सूनबाई? 'कोलावेरी डी' फेम संगीतकारासोबत बांधणार साताजन्माची गाठ

SRH Owner Kavya Maran Marrying Anirudh Ravichander: 18000 कोटींच्या सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन म्युझिक कंपोझर, गायक अनिरुद्ध रविचंदर यांच्याशी लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

SRH Owner Kavya Maran Marrying Anirudh Ravichander: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) फ्रँचायझी 'सनरायझर्स हैदराबाद'(Sunrisers Hyderabad) ची मालकीण असलेली काव्या मारन  (Kavya Maran), लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन आहे. पण, सध्या सोशल मीडियावर काव्या मारनबाबत काही चर्चा रंगल्या आहेत. काव्या मारन बॉलिवूडचा प्रसिद्ध म्युझिक कंपोझर आणि गायकासोबत लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे अनेकांचा हॉर्ट ब्रेक झालाय.

18000 कोटींच्या सनरायझर्स हैदराबादची (Sunrisers Hyderabad) मालकीण काव्या मारन (Kavya Maran)   म्युझिक कंपोझर (Music Composer), गायक अनिरुद्ध रविचंदर (Singer Anirudh Ravichander) यांच्याशी लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 'सन टीव्ही नेटवर्क'मध्ये कार्यकारी संचालक (Executive Director) असलेली काव्या, आयपीएल सामन्यांदरम्यान अनेकदा आपल्या संघाला पाठिंबा देताना दिसते. आतापर्यंत बऱ्याचदा काव्या आणि अनिरुद्ध यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्यात, पण दोघांनीही आजवर याला दुजोरा दिलेला नाही. 

अनिरुद्धचा जन्म चेन्नईमध्ये झाला. तो एका प्रसिद्ध चित्रपट-कुटुंबातील आहे. त्याचे वडील रवी राघवेन्द्र हे अभिनेते आहेत आणि आई लक्ष्मी रविचंदर या शास्त्रीय नृत्यांगना आहेत. विशेष म्हणजे, अनिरुद्धचे सुपरस्टार रजनीकांत यांच्याशीही नातं आहे.

अनिरुद्ध रविचंदर, रजनीकांत यांच्यात नातं काय? (What Is Relationship Between Anirudh Ravichander, Rajinikanth?)

म्युझिक कंपोझर अनिरुद्ध हा दाक्षिणात्य स्टार रवी राघवेंद्र यांचा मुलगा. त्याची आई, लक्ष्मी, या एक शास्त्रीय नृत्यांगना आहेत. अनिरुद्ध यांनी रजनीकांत, कमल हासन, ज्युनियर एनटीआर आणि थलपथी विजय यांच्यापासून ते अगदी शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमापर्यंत अनेक बड्या कलाकारांच्या सिनेमांसाठी संगीत दिलंय. पण, फारच कमी लोकांना ठाऊक आहे की, म्युझिक कंपोझर अनिरुद्ध आणि साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचं कौटुंबीक नातं आहे. रजनीकांत यांच्या पत्नी लता या अनिरुद्धच्या मावशी आहेत. त्यामुळे, नात्यानुसार रजनीकांत हे अनिरुद्ध यांचे काका (मावशीचे पती) लागतात.

अनिरुद्धच्या काकांचा खुलासा 

अनिरुद्ध आणि काव्या यांच्या लग्नाच्या चर्चांची सुरुवात अनिरुद्धचे काका आणि अभिनेते वाय. जी. महेंद्र यांनी लग्नाबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे झालीय. 'केपीटीव्ही'ला (KPTV) दिलेल्या एका मुलाखतीत, अनिरुद्धच्या लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, "अनिरुद्ध हा अत्यंत समजूतदार मुलगा आहे. माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार, काव्या मारन यांच्याशी त्याचं लग्न जवळपास निश्चित झालंय. तो एका अत्यंत प्रतिष्ठित कुटुंबाचा भाग होणार आहे. या निमित्तानं मी त्याचं अभिनंदन करू इच्छितो..."

'या' सुपरहिट सिनेमामुळे अनिरुद्धला मिळालेली प्रसिद्धी ()

अनिरुद्ध 2011 मध्ये 'व्हाय दिस कोलावेरी डी' (Why This Kolaveri Di) या प्रचंड गाजलेल्या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आला. तेव्हापासून त्यानं अनेक सुपरहिट गाणी इंडस्ट्रीला दिलीत आणि तमिळ सिनेसृष्टीत एक आघाडीचा संगीतकार म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलंय. 'जेलर', 'जर्सी', 'जवान' आणि 'लिओ' यांसारख्या सिनेमांमधलं त्यानं दिलेलं म्युझिक विशेष गाजलं. त्याचं सिनेसृष्टीशी कौटुंबिक नातंही आहे. तमिळ सुपरस्टार रजनीकांत त्याचे काका आहेत.

अब्जाधीश घरची लेक, काव्या मारन (SRH Owner Kavya Maran)

अनिरुद्धचे पणजोबा, के. सुब्रमण्यम, हे 1930 च्या दशकातील सिनेनिर्माते होते आणि त्याच्या आत्या या प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम आहेत. दुसरीकडे, काव्या ही व्यावसायिक कलानिधी मारन यांची कन्या आहे. सनरायझर्स हैदराबाद व्यतिरिक्त, ती SA20 लीगमधील 'सनरायझर्स ईस्टर्न केप' आणि 'द हंड्रेड' (The Hundred) स्पर्धेतील 'सनरायझर्स लीड्स' या संघांची सह-मालक देखील आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kavya Maran Wedding: हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
Embed widget