एक्स्प्लोर

Udayanidhi Stalin On Trisha Krishnan Thalapathy Vijay Relation: त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात

Udayanidhi Stalin On Trisha Krishnan Thalapathy Vijay Relation: टीव्हीकेनं उदयनिधी यांचं वक्तव्य अत्यंत 'घृणास्पद' असल्याचं म्हटलंय. तर, भाजपनं थेटच त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. 

Udayanidhi Stalin On Trisha Krishnan Thalapathy Vijay Relation: सध्या तामिळनाडूचं (Tamil Nadu Politics) राजकारण भलतंच तापलं असून विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांच्या एका वक्तव्यानं गदारोळ माजला. उदयनिधी स्टॅलिन यांनी अभिनेत्री त्रिशा कृष्णन (Actress Trisha Krishnan) आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय (Tamil Nadu CM Thalapathy Vijay) यांच्यावर आक्षेपार्ह द्विअर्थी टिका केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर द्रमुक नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलंय. टीव्हीकेनं उदयनिधी यांचं वक्तव्य अत्यंत 'घृणास्पद' असल्याचं म्हटलंय. तर, भाजपनं थेटच त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. 

कावेरी नदीच्या मुद्द्यावर बोलताना उदयनिधी स्टॅलिन यांनी वादग्रस्त भाषण केलं. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करत असतानाच प्रेक्षकांनी 'त्रिशा, त्रिशा' अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यावर ते काही काळ शांत राहिले आणि त्यानंतर त्रिशाचा संदर्भ देणारं आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं. 

दरम्यान, त्रिशा कृष्णन ही साऊथची सुपरस्टार अभिनेत्री आहे. थलपती विजय यांच्या पत्नीनं त्यांच्यावर अभिनेत्रीसोबतच्या विवाहबाह्य संबंधांचे आरोप करत, घटस्फोट घेतला. थलपती विजय यांच्या पत्नीनं ज्या अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचे आरोप केलेत, ती अभिनेत्री त्रिशा असल्याच्या चर्चा रंगलेल्या. त्यानंतर थलपती यांच्या शपथविधी सोहळ्यातही त्रिशा हक्कानं मिरवताना दिसली. तेव्हापासून थलपती विजय आणि त्रिशा यांच्या कथित अफेअरच्या चर्चांना आणखी उधाण आलं. 

वाद नेमका काय? (Udayanidhi Stalin Statement On Trisha Krishnan)

कावेरी पाणी वाटपाच्या वादावरून तंजावर इथे आयोजित एका निषेध सभेत बोलताना उदयनिधी स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री विजय यांच्यावर टीका केली. तामिळनाडूला कावेरीचं एक थेंबही पाणी मिळालं नाही, तरीही मुख्यमंत्री या संपूर्ण प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. त्यावेळी उपस्थितांपैकी काही जणांनी "त्रिशा... त्रिशा..." अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. यावर उदयनिधी यांनी स्मितहास्य करत आपलं भाषण थांबवलं आणि अशी टिप्पणी केली, जी अनेकांना अभिनेत्री त्रिशा यांच्या संदर्भातील आणि दुहेरी अर्थ असलेली आक्षेपार्ह टिप्पणी वाटली. त्यानंतर या प्रकरणाचं रूपांतर राजकीय वादात झालं. 

व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यावर सत्ताधारी टीव्हीके (TVK) तसेच विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या वतीनं तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. टीव्हीकेचे आमदार रेवंत चरण यांनी लिहिलंय की, "अत्यंत घृणास्पद... कोणाबद्दलही अशी लज्जास्पद टिप्पणी करणं पूर्णपणे अस्वीकार्य आहे. यातून त्या कुटुंबाची मानसिकता, राजकीय संस्कृती आणि घसरलेला दर्जा दिसून येतो." 

भाजपचा उदयनिधींवर आक्रमक पवित्रा

भाजपनं उदयनिधी स्टॅलिन यांच्या अटकेची मागणी केलीय. तामिळनाडू भाजपचे मुख्य प्रवक्ते नारायणन तिरुपती यांनी ट्विटरवर म्हटलंय की, उदयनिधींचं दुहेरी अर्थ निघणारं वक्तव्य अत्यंत नीच, अश्लील, असभ्य आणि लज्जास्पद होतं. वस्तुस्थिती अशी आहे की, एखादा गुंड किंवा चोरही, ज्याला आई, पत्नी किंवा मुलगी आहे, अशी असभ्य टिप्पणी करणार नाही. अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्यांना कोणतीही आई, पत्नी किंवा मुलगी कधीही माफ करणार नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Om Puri Wife Seema Kapoor Revealed Husbands Affair: 'ओम पुरींचे घरातल्याच मोलकरणीसोबतच संबंध...'; घटस्फोटीत पत्नीचा धक्कादायक दावा, अभिनेत्याच्या एक्स्ट्रा मॅरेटियल अफेअर्सबाबतही खुलासा

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Udayanidhi Stalin On Trisha Krishnan Thalapathy Vijay Relation: त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
Ravi Kishan on viral videos: 'प्रत्येक मुलाला रवि किशन व्हावंसं वाटेल'; व्हायरल व्हिडीओंवर अभिनेता नेमकं काय म्हणाला?
'प्रत्येक मुलाला रवि किशन व्हावंसं वाटेल'; व्हायरल व्हिडीओंवर अभिनेता नेमकं काय म्हणाला?
Sanjay Leela Bhansali Heroines: ''पारो ते गंगूबाई...,भन्साळींच्या सिनेमात हिरोपेक्षा 'या' अभिनेत्रीच ठरल्या सरस; एकेका डायलॉगने गाजलेलं थिएटर, तुमची फेवरेट कोण? 
'पारो ते गंगूबाई...,भन्साळींच्या सिनेमात हिरोपेक्षा 'या' अभिनेत्रीच ठरल्या सरस; एकेका डायलॉगने गाजलेलं थिएटर, तुमची फेवरेट कोण? 
Subodh Bhave On Sai Tamhankar: 'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Embed widget