संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीतून रुपया पण नको; करिश्मा कपूरच्या वकिलाची कोर्टात माहिती, पण कोर्टात का गेली?
Karisma Kapoor : संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीतून रुपया पण नको; करिश्मा कपूरच्या वकिलाची कोर्टात माहिती, पण कोर्टात का गेली?

Karisma Kapoor : अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्या मुलांनी वडिल संजय कपूर यांच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीत वाटा मिळवण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. विशेष म्हणजे करिना कपूरची समायरा आणि कियान ही दोन्ही मुलं सावत्र आई प्रिया सचदेव हिच्याविरोधात न्यायालयीन लढाई लढत आहेत. याप्रकरणात करिश्मा आपल्या मुलांचे प्रतिनिधित्व करत आहे, मात्र ती स्वतः या खटल्याची पक्षकार नाही. करिश्मा या खटल्यातून स्वतःसाठी कोणताही आर्थिक लाभ मागत नाही, तर ती केवळ आपल्या मुलांच्या आर्थिक स्थैर्यासाठी लढत आहे, असं करिश्माचे वकील महेश जेठमलानी यांनी स्पष्ट केले आहे.
करिश्मा कपूरच्या वकिलांचे स्पष्टीकरण
रिपब्लिक टीव्हीवरील चर्चेत जेठमलानी म्हणाले, “करिश्मा कपूरला स्वतःसाठी काहीच नको आहे. या खटल्याचा एकमेव उद्देश तिच्या मुलांना आर्थिकदृष्ट्या करणे, हा आहे. हे संजय कपूर यांना देखील हवे होते. त्यासाठी करार तयार करण्यात आला होता, ज्यात भारतातील त्याची मालमत्ता, कॉर्पोरेट मालमत्ता आणि बहुतांशी परदेशातील मालमत्ता समाविष्ट होत्या. त्यासाठी एक इच्छापत्र देखील होतं, जे कधीही उघड करण्यात आलेलं नाही किंवा नोंदणीकृतही नाही. त्यामुळे हा वाद केवळ त्या इच्छापत्राअंतर्गत येणाऱ्या मालमत्तेबाबत आहे, ट्रस्टच्या मालमत्तेबाबत नाही.”
मिडिया रिपोर्टनुसार, दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांची एकूण संपत्ती सुमारे ₹30,000 कोटी आहे. त्यांच्या पत्नी प्रिया सचदेव कपूर यांनी सांगितले की, संजय यांच्या इच्छापत्रानुसार करिश्माची मुलं समायरा आणि कियान यांना ₹1,900 कोटी दिले जात आहेत. मात्र समायरा आणि कियान यांनी हे इच्छापत्रं खोटी असल्याचे सांगून त्याचा विरोध केला आहे. या संदर्भात जेठमलानी म्हणाले, “ही मुलं प्रिया कपूर यांच्या कृपेवर काहीही मिळवत नाहीत. ही संजय कपूर यांचीच मालमत्ता आहे. कोणी आम्हाला उपकार करत नाही. उर्वरित ₹28,000 कोटी प्रिया सचदेव सोडून देणार का? हा कसला मूर्खपणा आहे? आम्ही फक्त मुलांच्या योग्य वारशासाठी लढत आहोत.”
संजय कपूर वारसा प्रकरण
समायरा आणि कियान यांच्यासोबतच दिवंगत उद्योगपतींची आई राणी कपूर यांनीदेखील प्रिया यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. त्यांचा आरोप आहे की प्रिया यांनी सादर केलेली इच्छापत्रं बनावट आहेत आणि त्यातून त्यांना काहीच मिळत नाही. न्यायालयाने प्रिया यांना त्यांच्या दिवंगत पतीची सर्व मालमत्ता उघड करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ऑक्टोबरमध्ये होणार आहे.
संजय कपूर हे ऑटो निर्माता सोना कॉमस्टारचे संस्थापक आणि चेअरमन होते. यंदा जून महिन्यात लंडनमध्ये त्यांचे निधन झाले. त्यांनी अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत 2003 ते 2016 दरम्यान विवाह केला होता. घटस्फोटानंतर 2017 मध्ये त्यांनी प्रिया सचदेवशी लग्न केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या























