एक्स्प्लोर

Karan Kundra Propose Tejaswi Prakash: गुपचूप लग्नाच्या चर्चेत बिग बॉसच्या लोकप्रिय जोडीची अखेर चाहत्यांना गुडन्यूज! लग्नासाठी केलं प्रपोज ; Video व्हायरल

गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या या जोडीच्या लग्नाची चाहत्यांना आतुरता होती. करणने अतिशय रॉयल अंदाजात तेजस्वीला प्रपोज केलं.

Tejaswi Prakash Karan Kundra: गेल्या काही दिवसांपासून टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय कपल्स पैकी असलेल्या अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांनी गुपचूप लग्न उरकल्याची चर्चा होती. अभिषेक कुमारने दोघांनी कोर्ट मॅरेज केल्याच्या विधानामुळे ही चर्चा रंगली होती. दोघांच्याही लग्नाची चाहते प्रचंड वाट पाहत असताना आता  ‘बिग बॉस 15’मधून सुरू झालेल्या करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या प्रेमकहाणीने आता नवं वळण घेतलं आहे. करणने तेजस्वीला लग्नासाठी प्रपोज केलं असून हा खास क्षण पाहून चाहत्यांनाही आनंदाचा धक्का बसला आहे. गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या या जोडीच्या लग्नाची चाहत्यांना आतुरता होती. करणने अतिशय रॉयल अंदाजात तेजस्वीला प्रपोज केलं.

करणने तेजस्वीला केलं प्रपोज

नेटफ्लिक्सवर येणाऱ्या ‘देसी ब्लिंग’ या नव्या शोमध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश एकत्र दिसणार आहेत. हा शो 20 मेपासून स्ट्रीम होणार आहे. याच शोमधील एक क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये करण मोठ्या डायमंड रिंगसह पंजाबी स्टाईलमध्ये तेजस्वीला लग्नासाठी विचारताना दिसतो.व्हिडिओमध्ये करण गुडघ्यावर बसून तेजस्वीला प्रपोज करतो. तो पंजाबी भाषेत तिच्यासोबत कायम राहण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नंतर तिला अंगठी घालून किस करतो. हा क्षण पाहून तेजस्वी भावूक होते. तिला याची अजिबात अपेक्षा नसल्यामुळे तिच्या डोळ्यांत अश्रू येतात. दोघांनी कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. मात्र, या शोमध्ये त्यांनी एकमेकांना प्रपोज केल्याचे पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसलाय.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by TejranAreSoulmates (@tejransoulmates2022)

लवकरच लग्नबंधनात अडकणार?

करण “Will You Marry Me?” असं विचारताच, डोळ्यांत पाणी आणून तेजस्वी म्हणते, “आपण खूप काही एकत्र पाहिलं आहे. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर अनेकांनी म्हटलं होतं की हे नातं दोन आठवडेही टिकणार नाही. कुणी मला फेक म्हटलं, कुणी तुला फेक म्हटलं, तर कुणी आपल्या नात्यालाच फेक ठरवलं. पण आज आपण चार वर्षं एकत्र आहोत.” यानंतर करण म्हणतो, “Imperfectly Perfect Love Story हा शब्द तूच दिला होता. तू मला एक चांगला माणूस बनवलंस. आपण एकत्र घालवलेल्या प्रत्येक वर्षासोबत माझ्यासाठी प्रेमाचा अर्थ बदलत गेला. मला कधी वाटलंच नव्हतं की मला असं प्रेम मिळेल.”

करण आणि तेजस्वीची लव्हस्टोरी कोणापासून लपलेली नाही. ‘बिग बॉस 15’मध्येच दोघांनी आपलं नातं अधिकृत केलं होतं. ‘देसी ब्लिंग’ शोचं शूटिंग दुबईमध्ये झालं असून, हा व्हायरल व्हिडिओही तिथलाच असल्याचं सांगितलं जात आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Embed widget