Karan Johar Dating: कुणाला डेट करतोय प्रसिद्ध निर्माता करण जोहर? फिल्ममेकरनं स्वतःच केला खुलासा, सारेच झालेत अवाक्
Karan Johar Dating: फिल्ममेकर करण जोहर नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अलिकडेच त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि तो कोणाला डेट करतोय, याबाबतही त्यानं खुलासा केला आहे.
Karan Johar Dating: बॉलिवूडचा (Bollywood News) प्रसिद्ध फिल्ममेकर करण जोहर (Karan Johar) नेहमीच त्याच्या चित्रपटांमुळे आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. नेटकऱ्यांना तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात खूपच रस असतो. अनेकदा, करण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलताना दिसतो. यावेळी तर त्यानं थेट सोशल मीडियावर तो कुणाला डेट करतोय, ते जाहीर करुन टाकलं आहे. करणच्या वक्तव्यानं चाहते पुरते हैराण झाले आहेत. करणची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
करण जोहरची ही पोस्ट खूपच मजेदार आहे. ही पोस्ट वाचून अनेकांना हसूच आवरत नाहीय. करणनं सांगितलं की, तो ज्या व्यक्तीला डेट करतोय, तो करणची बिलही भरतो.
करण जोहर इंस्टाग्रामला डेट करतोय
करणनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलं आहे की, "मी इंस्टाग्रामला डेट करत आहे. तो माझं ऐकतो... मला माझ्या स्वप्नांना फॉलो करायला सांगतो आणि माझी बिलंही भरतो. अनुसरण करण्यास सांगतो आणि माझी बिलंही भरतो. प्रेम न करणं काय असतं?" करण जोहरची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
यापूर्वी एकटेपणावर जाहीरपणे बोललेला करण
गेल्या वर्षी दिवाळीत करणनं त्याच्या आयुष्यातल्या एकाकीपणाबद्दल जाहीरपणे भाष्य केलं होतं. त्याने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवर लिहिलं होतं की, "दिवाळीच्या रात्री, इतक्या भेटी-गाठी, इतक्या गप्पा, तरीही गर्दीतला एकटेपणा, मी माझ्या सिंगल स्टेटसपासून कधी वेगळा होईन."
दरम्यान, करण जोहरच्या कामाबाबत बोलायचं झालं तर, करण जोहरनं अलिकडेच सिद्धार्थ मल्होत्राबाबत रॅम्प वॉक केला. यावेळी करण व्हाईट डिझायनर वेअरमध्ये दिसला. त्यानं ट्राउझर्स आणि ट्रेंच कोट आणि सॅटिन शर्ट घातला होता. करणनं त्याचा लूक हिऱ्याच्या नेकलेसनं पूर्ण केला होता. करण जोहरनं आपल्या रॅम्प वॉकचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. करण लवकरच नेटफ्लिक्ससाठी एक वेब सीरिज दिग्दर्शित करणार आहे. सर्वात शेवटी करण जोहरनं 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :