तीन पट धमाका, तीन पट हंगामा, तीन पट मनोरंजन; लवकरच येणार 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'चा तिसरा सीझन
The Great Indian Kapil Sharma Show Season 3 : 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'च्या तिसऱ्या सीझनची घोषणा करण्यात आली असून हा शो कधी आणि कुठे पाहता येणार आहे, ते जाणून घ्या.

The Kapil Sharma Show Season 3 : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. कपिल शर्माच्या कॉमेडी शोचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' सीझन 3 ची घोषणा झाली असून लवकरच हा शो नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. निर्मात्यांनी मजेशीर व्हिडीओ शेअर करत 'द ग्रेट इंडियन कपिल शो' सीझन 3 ची घोषणा केली आहे. या वेळीच्या शोची थीमही समोर आली आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा पहिला आणि दुसरा सीझन खूप धमाकेदार ठरल्यानंतर आता निर्माते या शोचा तिसरा सीझन घेऊन येत आहेत.
'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' सीझन 3 ची घोषणा
कपिल शर्माने काही महिन्यांपूर्वीच 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Sharma Show Season 3) तिसरा सीझन लवकरच येणार असल्याचे संकेत दिले होते. आता निर्मात्यांनी नेटफ्लिक्सवर एक मजेदार व्हिडिओ शेअर करून नवीन सीझनची घोषणा केली आहे. कपिल शर्मासोबत, सुनील ग्रोव्हर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, राजीव ठाकूर आणि अर्चना पूरण सिंग पुन्हा एकदा तुमचे तीन पट जास्त मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.
तिप्पट हंगामा करण्यास सज्ज आहे कपिल शर्मा
आता कपिल शर्माने नवीन सीझनची घोषणा झाली आहे. नेटफ्लिक्सने त्यांच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये शोमध्ये आतापर्यंत आलेले सर्व कलाकार तसेच दुसऱ्या सीझनमध्ये आलेले पाहुणे कलाकार दिसत आहेत. त्यासोबत त्यांनी लिहिलं की, 'आता 2025 चे फनीवॉर स्फोटक असेल. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा तिसरा सीझन लवकरच येत आहे. अनेक हास्य कलाकार आणि तेजस्वी कलाकारांसह फक्त नेटफ्लिक्सवर!
धमाल, मजा आणि हास्यकल्लोळ
तसेच, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या तिसऱ्या सीझनच्या थीमची झलक देखील दाखवण्यात आली आहे. नेटफ्लिक्सचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' तिसरा सीझन घेऊन तिप्पट जास्त मजा आणि हास्यकल्लोळ घेऊन परतणार आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चे दोन सीझन हिट झाल्यानंतर, प्रेक्षक बऱ्याच काळापासून त्याच्या नवीन सीझनची वाट पाहत होते. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :























