Emergency Movie Release Date : कंगना रणौतला मोठा झटका, इमर्जन्सीच्या रिलीजला ब्रेक; सेन्सॉरकडून प्रमाणपत्रासाठीही धडपड
Emergency Movie Release Date : कंगना रणौतच्या इमर्जन्सी सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला असून आता त्याच्या रिलीजलाही ब्रेक मिळाला असल्याचं पाहायला मिळतंय.
Emergency Movie Release Date : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने राजकारणात एन्ट्री घेतल्यानंतरचा पहिला सिनेमा इमर्जन्सी हा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला असल्याचं चित्र सध्या आहे. या सिनेमात कंगनाने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतरचा कंगनाच्या या सिनेमाची बरीच चर्चा होती. पण सध्या या सिनेमाला बराच संघर्ष करावा लागतोय. इतकच नव्हे तर सेन्सॉरकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठही या सिनेमाची धडपड सुरु आहे.
दरम्यान एबीपी न्यूजला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सिनेमा येत्या 6 सप्टेंबर रिलीज होणार नाही. सिनेमाच्या रिलीजची तारीखही पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात इमर्जन्सी सिनेमाविरोधात सुनावणी सध्या सुरु आहे. हा सिनेमा शिखांच्या विरोधात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मोहालीचे रहिवासी गुरिंदर सिंग आणि जगमोहन सिंग यांनी इमर्जन्सी सिनेमाविरोधात याचिका दाखल केली आहे.
सिनेमाला सेन्सॉरकडून प्रमाणापत्रही नाही
दरम्यान या याचिकेमध्ये सेन्सॉर प्रमाणपत्र मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी सीबीएफसीच्या वतीने उपस्थित असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सत्य पॉल जैन यांनी न्यायालयाला माहिती दिली की,चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्याचा विचार केला जात आहे, परंतु सध्या तरी चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र जारी करण्यात आलेले नाही. नियमानुसार, सिनेमाला सेन्सॉर प्रमाणपत्र दिले जाईल आणि चित्रपटाबाबत कोणाला काही आक्षेप असल्यास ते सेन्सॉर बोर्डाला त्याबाबत कळवू शकतात, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
चित्रपटाच्या प्रदर्शनावर तीव्र आक्षेप
अकाली दलानेही सेन्सॉर बोर्डाला कायदेशीर नोटीसही पाठवून चित्रपटाच्या प्रदर्शनावर तीव्र आक्षेप नोंदवला होता. एसजीपीसीनेही हा चित्रपट शीखविरोधी असल्याचा आरोप केला होता. चित्रपटावर बंदी घालण्याची आणि रिलीजपूर्वी शीख प्रतिनिधींना चित्रपट दाखवण्याची मागणी केली होती.आणीबाणीच्या निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान सिनेमाचे निर्मात याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करणार असल्याचीही माहिती एबीपी न्यूजला मिळाली आहे.
View this post on Instagram