(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi Season 5 : 'रितेश भाऊंनी वाट लावली', ट्रोल करणाऱ्यांना जान्हवीच्या नवऱ्याचं उत्तर; म्हणाला, 'मांजरेकर आणि त्यांची स्पर्धा...'
Bigg Boss Marathi Season 5 : रितेश देशमुखला होस्टिंगवरुन ट्रोल करणाऱ्यांना जान्हवीच्या नवऱ्याने चोख उत्तर दिलं असल्याचं पाहायला मिळत आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये (Bigg Boss marathi New Season) होस्टच्या खुर्चीमध्ये रितेश देशमुख बसला आहे. रितेश भाऊचा धक्का हा घरातल्या स्पर्धकांसाठी चांगलाच धक्कादायक ठरतोय. कारण घरातल्या प्रत्येक स्पर्धकाची शाळा रितेश भाऊकडून घेतली जातेय. त्यातच त्यांच्या घरातील वागण्यामुळे त्यांना शिक्षा देखील केली जातेय. पण असं असलं तरीही रितेश भाऊला सध्या त्याच्या होस्टिंगवरुन बरंच ट्रोल केलं जातंय. इतकच नव्हे तर मांजरेकरांसोबत त्याची तुलना करत असल्याचं चित्रही सध्या आहेत.
रितेश भाऊंनी नुकतच जान्हवीला तिच्या वागण्याची शिक्षा देत तिला तुरुंगात टाकलं. त्यानंतर अनेकांनी रितेश भाऊंचं कौतुक केलं. असं असलं तरीही शनिवार 31 ऑगस्टच्या भाऊच्या धक्क्यानंतर रितेशला पुन्हा एकदा ट्रोल केलं जातंय. या सगळ्यावर आता रितेश भाऊने जिला शिक्षा दिली, त्या जान्हवीच्या नवऱ्याने भाष्य केलं आहे. तसेच रितेश देशमुखला ट्रोल करणाऱ्यांनाही त्याने चांगलच सुनावलं आहे.
'उगाच कशाला दोघांची स्पर्धा करताय'
किरण किल्लेकरने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं की, 'महेश मांजरेकरांना तुम्ही पहिले चार सिझन बघितलं आहे. रितेश देशमुख यांचा पहिलाच सिझन आहे. त्यांना करु तर द्या. त्यांच्या पहिल्याच सिझनमध्ये तुम्ही म्हणता की, अरे मज्जा नाही आली, मज्जा नाही आली. त्यांना पण समजण्यासाठी वेळ तर द्या. ते आले की तुम्ही म्हणता, भाऊंनी वाट लावली, काही मज्जा नाही आली. मागच्या आठवड्यात जशी भाऊंनी शिक्षा दिली तसे भाऊ हिरो झाले. तोपर्यंत ते चुकीचे होते. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला वाईट बोल असं सांगत आहात. आज छोटा पुढारीलाही खूप आदर देऊन बोलतात ते. महेश मांजरेकर असते तर त्यांनी ते केलंच असतं, पण आता ते आहेत का? आता जे आहेत त्यांच्यावर बोला. उगाच कशाला दोघांची स्पर्धा करताय. महेश मांजरेकरांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहितेय, ते बिनधास्त बोलू शकतात. रितेश देशमुख तसं नाही बोलू शकत.'
रितेश देशमुख यांचं काम योग्य सुरु आहे - किरण किल्लेकर
पुढे किरणने म्हटलं की, रितेश देशमुख यांचा स्वभाव प्रेमळ आहे. रागीट स्वभावाची ती व्यक्ती नाही. त्यासाठी लोकांनी त्यांनाही खूप ट्रोल केलं आहे. म्हणजे लोकांचं असं म्हणणं आहे की, जे चुकतायत त्यांच्यावर तुम्ही फक्त भडका. ती व्यक्ती वाईट आहे, त्यांच्यावर तुम्ही ओरडा. रितेश देशमुखांनी जे केलं ते बरोबरच केलं. ती जे काही वागली होती ते चुकीचंच होतं, त्याची शिक्षा तिला भोगावीच लागणार होती. आज ती आतमध्ये भोगतेय, उद्या बाहेर आल्यावरही कशी भोगेल ते मला माहित नाही. रितेश देशमुख यांचं काम योग्य सुरु आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. ती व्यक्ती ज्या पद्धतीने स्पर्धकांसोबत वागते, आतापर्यंत इतकं चांगल्या पद्धतीने स्पर्धकांसोबत कुणीही वागलेलं नाहीये आणि कुणीच वागू शकत नाही.
ही बातमी वाचा :
Ritiesh Deshmukh : बिग बॉसमध्येही झळकलं गुलाबी जॅकेट; रितेश भाऊने सांगितलं थेट 'बारामती' कनेक्शन