Bhool Bhulaiyaa 2 :'बॉक्स ऑफिसवरील दुष्काळ संपवला'; कंगनाकडून भूल भुलैय्या-2 चं कौतुक
कंगना रनौतनं (Kangana Ranaut) या चित्रपटाचं कौतुक केलं असून एक खास पोस्ट तिनं सोशल मीडियावर शेअर केली.
Kangana Ranaut Praises Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा (Kiara Advani) भूल भुलैय्या-2 (Bhool Bhulaiyaa 2) हा चित्रपट 20 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहेत. हॉरर कॉमेडीवर आधारित असणारा हा चित्रपट प्रेक्षकांबरोबरच सेलिब्रिटींची देखील मनं जिंकत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. आता 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' कंगना रनौतनं (Kangana Ranaut) देखील या चित्रपटाचं कौतुक केलं असून एक खास पोस्ट तिनं सोशल मीडियावर शेअर केली.
कंगनाच्या धाकड चित्रपटाची आणि कार्तिकच्या भूल भुलैय्या -2 या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली आहे. 'ओपनिंग-डे' ला भूल भुलैय्या -2 14.11 कोटींची कमाई केली. धाकड चित्रपटाला मात्र प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. तरी देखील कंगनानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन भूल भुलैय्या -2 या चित्रपटाचं कौतुक केलं. कंगनानं पोस्टमध्ये लिहिलं, 'या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील दुष्काळ संपवला आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचे तसेच चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन.'
भूल भुलैय्या- 2 ची सुरुवात मॉर्निंग शोमध्ये 20 टक्के ऑक्यूपेंसीनं झाली. चित्रपटाची सरासरी ऑक्यूपेंसी ही 35 टक्के आहे. 2007 मध्ये रिलीज झालेल्या भूल भुलैया चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे.भूल भुलैया चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अक्षय कुमार, अमिशा पटेल, विद्या वालन आणि शाइनी आहूजा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. तर भूल भूलैया-2 मध्ये कार्तिक आर्यनसोबतच तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिक आर्यन हा रूह बाबा ही भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी कार्तिकनं 15 कोटी मानधन घेतलं आहे. तर कियारा आडवाणीनं या चित्रपटामध्ये रीत ठाकुर ही भूमिका साकारली आहे. कियारानं या चित्रपटासाठी दोन कोटी रूपये मानधन घेतलं आहे.
संबंधित बातम्या
- Cannes 2022: 'स्टॉप रेपिंग अस' ; कान्सच्या रेड कार्पेटवर युक्रेनमधील महिलेच्या घोषणा
- Cannes Film Festival 2022 : अमृता फडणवीसांची 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला हजेरी; ट्विटरवर शेअर केला फोटो