Kangana Ranaut Met Bageshwar Baba : 'भावाप्रमाणे मिठी मारु'; अयोध्येत कंगणाने घेतली बागेश्वर बाबाची भेट
kangana Ranaut Met Bageshwar Baba : अयोध्येत आज (दि.22) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी देशातील अनेक सेलिब्रिटींची, राजकीय नेत्यांची उपस्थिती असणार आहे.
kangana Ranaut Met Bageshwar Baba : अयोध्येत आज (दि.22) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी देशातील अनेक सेलिब्रिटींची, राजकीय नेत्यांची उपस्थिती असणार आहे. दरम्यान, या सोहळ्यासाठी अभिनेत्री कंगणा रणौत (kangana Ranaut) एक दिवस अगोदरच पोहोचली होती. अयोध्येत पोहोचल्यानंतर ती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्या अपडेट्स लोकांपर्यंत पोहोचवत आहे. अयोध्येतील धर्मगुरुंची कंगणा रणौत (kangana Ranaut) भेट घेतना दिसत आहे. तिने राम भद्राचार्य यांची भेट घेतली. या शिवाय तिने प्रसिद्ध हनुमानगढी मंदिरात जात दर्शन घेतले. त्यानंतर ती मंदिरात जाऊन साफ सफाई करतानाही दिसली आहे.
बागेश्वर बाबाची भेट (Kangana Met Bageshwar Baba)
कंगणा रणौतने अयोध्येत बागेश्वर बाबाचीही भेट घेतली आहे. बागेश्वर बाबाला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. कंगणाने बागेश्वर बाबा सोबतचे फोटो शेअर केले आहेत. कंगणा बागेश्वर बाबा माझ्या लहान भावाप्रमाणे आहेत, असे म्हणाली आहे. मला वयाने लहान असणारा गुरु भेटला असल्याचेही कंगणा म्हणाली आहे.
कंगणाने इन्स्टा स्टोरीमध्ये काय लिहिले? (Kangana Met Bageshwar Baba)
कंगणाने अयोध्येतील फोटो शेअर करताना लिहिले की, "पहिल्यांदा वयाने लहान असलेला गुरु भेटला. माझ्यापेक्षा जवळपास 10 वर्षांनी लहान आहे. मनाला वाटले तर लहान भावाप्रमाणे मिठू मारु. नंतर लक्षात आले की, कोणी वयाने मोठा आहे, म्हणून गुरु होत नाही. तर कामामुळे गुरु होतो. गुरुच्या पाया पडले आणि आशीर्वाद घेतला, जय बजरंगबली"
कंगणाने घेतला धर्मेंद्रशास्त्री बागेश्वर बाबाचा आशीर्वाद (Kangana Met Bageshwar Baba)
कंगणा पुढे बोलताना म्हणाली की, कोणी वयाने मोठा आहे, म्हणून गुरु होत नाही. तर कामामुळे गुरु होतो. गुरुच्या पाया पडले आणि आशीर्वाद घेतला, जय बजरंगबली"
#WATCH | Uttar Pradesh: Actress Kangana Ranaut participates in cleanliness drive at Hanuman Garhi Temple in Ayodhya.
— ANI (@ANI) January 21, 2024
She is in Ayodhya to attend the Pran Pratishtha ceremony tomorrow. pic.twitter.com/LpElT3ROdf
View this post on Instagram
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या