'साडी नको, ब्रँडचं नावही घेऊ नको' कंगना रणौतला नीना गुप्ताच्या लेकीनं साडीवरून टोकलं
Kangana Ranaut Opens Up About Ram Mandir Event Incident: कंगना रणौतने मसाबा गुप्तावर थेट पोस्टद्वारे नाराजी व्यक्त केली. रामजन्मभूमी उद्घाटनावेळी साडी न नेसण्याचा सल्ला दिल्याचा आरोप.

Kangana Ranaut Opens Up About Ram Mandir Event Incident: भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत आपल्या बिनधास्त वक्तव्यांवरून चर्चेत असते. ती बऱ्याच मुद्द्यांवर आपले स्पष्ट मत मांडत असते. वक्तव्यांमुळे ती कायम चर्चेत असते. कंगना रणौत अलिकडेच पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिनं एका पोस्टद्वारे डिझायनर मसाबा गुप्तावर संताप व्यक्त केला आहे. रामजन्मभूमीच्या उद्घाटनावेळी तिनं फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताची साडी नेसली होती. मात्र, डिझायनरने तिला साडी नेसू नको, असे थेट सांगितले. यामुळे तिनं थेट पोस्टद्वारे संताप व्यक्त केला. सध्या कंगना रणौतची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
कंगना रणौतला रामजन्मभूमी उद्घाटनासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. तिला फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताची साडी नेसायची होती. मात्र, मसाबाने तिला साडी नेसण्यास मनाई केली. तसेच ब्रँडचे नाव न घेण्याचाही सल्ला दिला. मात्र, कंगनाने आधीच साडी नेसली होती. तिला नंतर साडी न घालण्यास सांगितले. यामुळे तिला अपमानित वाटले. यानंतर कंगनाने पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली.
पोस्टमध्ये कंगनानं नेमकं काय लिहिलं?
View this post on Instagram
कंगनाने पोस्टमध्ये म्हटलं की, "मी कधीही विसरणार नाही असा एक माझ्यासोबत प्रसंग घडला. रामजन्मभूमी उद्घाटनासाठी मला फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताची साडी नेसायची होती. दरम्यान, मसाबा गुप्ताने तिच्या स्टायलिस्टला, कार्यक्रमासाठी साडी नेसू नये आणि ब्रँडचे नाव घेण्यास सांगायला सांगितले. परंतु, मसाबाने आधीच साडी नेसली होती. तसेच लखनऊहून अयोध्येच्या दिशेनं निघाली होती. मला तेव्हा प्रचंड अपमानित वाटलं. तेव्हा मी खूप रडले होते", असं तिनं पोस्टद्वारे सांगितलं.
कंगना पोस्टमध्ये म्हणाली, "काही फॅशन डिझायनर्स सुरूवातीला तिचे मित्र होतात. नंतर दूर जातात. पाठिंबा देणे बंद करतात. या गोष्टीचा प्रचंड त्रास होतो", असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, मसाबा गुप्ताने नेमकं असं का केलं? असा प्रश्न आता नेटकरी उपस्थित करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'माझे न्यूड फोटो हवेत का?' बोल्ड AI फोटो व्हायरल होताच सीमा आनंद यांचा संताप, FIR केला दाखल
























