'माझे न्यूड फोटो हवेत का?' बोल्ड AI फोटो व्हायरल होताच सीमा आनंद यांचा संताप, FIR केला दाखल
Seema Anand Reacts Strongly to AI Misuse: सीमा आनंद यांच्या एआयद्वारे तयार केलेल्या अश्लील फोटोंचा प्रकार उघड. सोशल मीडियावर ट्रोलिंगनंतर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Seema Anand Reacts Strongly to AI Misuse: कथाकार आणि रिलेशनशिप एक्सपर्ट सीमा आनंद यांची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. वयाच्या 63 वर्षी ते रिलेशशिप आणि लैंगिक संबंधांवर जोडप्यांना सल्ला देत आहे. त्यांचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात. अलिकडेच त्यांनी एका पॉडकास्टवर नातेसंबंध आणि जवळीक यांसारख्या विषयांवर खुलेपणाने आपले मत मांडले. तसेच रिलेशनशिपमध्ये असलेल्या जोडप्यांना सल्लाही दिला. सध्या त्यांची मुलाखत सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मात्र, काही नेटकऱ्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केलं. काहींनी त्यांचा एआयचा वापर करून अश्लील फोटो तयार केले. याच गोष्टीवरून नाराजी व्यक्त करत त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
व्हिडिओवर सीमा आनंद यांनी व्यक्त केला संताप
व्हिडिओ सीमा म्हणाल्या, "गेल्या आठवड्यात माझे विवस्त्र केलेले फोटो एआयचा वापर करून तयार करण्यात आले. तसेच सोशल मीडियात व्हायरल करण्यात आले. हे प्रकरण समोर येताच मी अॅक्शन घेतली. मी या प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. ही घृणास्पद मानसिकता मला घाबरवते", असं त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. "माझा चेहरा एका शरीरावर चिकटवला गेला आहे", या गोष्टीला त्यांनी बलात्कारी मानसिकता असं म्हटलं आहे. या व्हिडिओतून त्यांनी काही तरूणांसमोर प्रश्न देखील उपस्थित केला आहे, "तुम्हाला नोकरी आहे ना कोणता छंद. तुम्ही महिलांचे नग्न फोटो काढत बसता का? मी 63 वर्षांची आहे. तुम्हाला माझे न्यूड फोटो हवेत का?", असा संताप व्यक्त करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
सीमा आनंद यांचा व्हिडिओ व्हायरल
व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं की, "इंटरनेटवर सध्या सत्य विकृत करून केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. या कारणामुळे खरे मुद्दे झाकले जातात", असं त्यांनी म्हटलं आहे. सीमा आनंद यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
सीमा आनंद नक्की आहेत तरी कोण?
View this post on Instagram
सीमा आनंद या पौराणिक कथाशास्त्रज्ञ आहेत. त्यांचा कामसूत्र आणि प्राचीन कथांवर अभ्यास आहे. ते या माध्यमातून रिलेशनशिपवर जोडप्यांना सल्ले देतात. ते नेहमी आपल्या बोल्ड वक्तव्यासाठी चर्चेत असतात. त्यांचे भाषण आणि पुस्तकांमुळे लाखो लोकांना प्रेरणा मिळाली आहे. काही नेटकरी ट्रोल तर काही नेटकरी त्यांच्या भाषणांचा आणि मुलाखतींचे कौतुक करतात.
























