Laal Singh Chaddha : कंगना म्हणाली, 'हे आमिरच करतोय'; 'बायकॉट लाला सिंह चड्ढा' बद्दल शेअर केली पोस्ट
सध्या सोशल मीडियावर 'बायकॉट लाला सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. या विषयावर कंगनानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.
Laal Singh Chaddha : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. पंगा क्विन अशी ओळख असणारी कंगना तिच्या वेगवेगळ्या विषयांवर मत मांडत असते. सध्या सोशल मीडियावर 'बायकॉट लाला सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. या विषयावर कंगनानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये कंगनानं काही लाला सिंह चड्ढा आणि आमिर खान (Amir Khan) यांच्याबद्दल लिहिलं आहे.
कंगनाची पोस्ट
कंगनानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'मला वाटतं की, लाल सिंह चड्ढा या आगामी चित्रपटाबद्दल जी निगेटिव्हिटी पसरवली जात आहे, ती मास्टरमाइंड आमिर खाननं स्वत:च पसरवली आहे. काही कॉमेडी चित्रपट सोडले तर यावर्षी कोणताही हिंदी चित्रपट हिट ठरला नाही. फक्त भारतीय संस्कृतीसोबत जोडल्या गेलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हॉलिवूड चित्रपटाच्या रिमेकला प्रेक्षकांची पसंती मिळत नाही. पण आता ते भारताला पण आता ते भारताला असहिष्णू म्हणतील. हिंदी चित्रपट निर्मात्यांनी प्रेक्षकांची आवड समजून घेणे आवश्यक आहे. हे हिंदू किंवा मुस्लिम असण्याबद्दल नाहीये. आमिर खानने हिंदुफोबिक पीके बनवला हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा चित्रपट होता. कृपया चित्रपटाला धर्म किंवा विचारसरणीशी जोडणे थांबवा.'
आमिरचा पीके हा चित्रपट रिलीज होण्यापूर्णी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यावेळी अनेकांचे मत होते की, या चित्रपटामध्ये हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. पण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. आता आमिरच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचा देखील लोक विरोध करत आहेत.
कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. तर लाल सिंह चड्ढा हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा सविस्तर बातमी
- Laal Singh Chaddha : 'मेरी मम्मी कहती थी...'; बहिष्कार घालण्याची मागणी होत असताना 'लाल सिंह चड्ढा'चे नवे पोस्टर आऊट
- Laal Singh Chaddha Boycott : बायकॉट 'लाल सिंह चड्ढा' वर आमिर खाननं सोडलं मौन; म्हणाला, 'लोकांना वाटतं मला भारत...'