Laal Singh Chaddha : 'मेरी मम्मी कहती थी...'; बहिष्कार घालण्याची मागणी होत असताना 'लाल सिंह चड्ढा'चे नवे पोस्टर आऊट
Laal Singh Chaddha : 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाचे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
Laal Singh Chaddha New Poster Out : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमा प्रदर्शित होत असताना सिनेमावर बहिष्कार मागणी होत आहे. अशातच या सिनेमाचे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा सध्या प्रमोशन, टीझर, पोस्टरमुळे चर्चेत नसून या सिनेमावर विरोध होत असल्याने हा सिनेमा चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी आमिर खान आणि करीना कपूरला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. दरम्यान निर्मात्यांनी या सिनेमाचे नवे पोस्टर आऊट केलं आहे. आमिरचे हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
आमिरचा वेगळा अंदाज
'लाल सिंह चड्ढा'च्या नव्या पोस्टरमध्ये आमिर खान एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. पोस्टरमध्ये आमिरचा चेहरा दिसण्याऐवजी त्याचे पाय दिसत आहेत. आमिरच्या बूटांवर फोकस करण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे. पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी लिहिलं आहे,"मेरी मम्मी कहती थी, जूतें बन्दे दा आयडेंटिटी कार्ड होंदे है".
'लाल सिंह चड्ढा' सिनेमाच्या नव्या पोस्टरवरदेखील नेटकऱ्यांकडून विरोध होत आहे. तर दुसरीकडे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आमिर आणि करीनाचे समर्थन करत आहेत . 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ऑक्टोबर महिन्यात हा सिनेमा ओटीटी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. आमिर खान आणि करीना कपूर याआधी '3 इडियट्स' या सिनेमात एकत्र दिसले होते. आमिर आणि करीनाची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. आता 'लाल सिंह चड्ढा' सिनेमात पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही जोडी पाहायला मिळणार आहे. चाहते या जोडीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसणार आहेत.
संबंधित बातम्या
Laal Singh Chaddha Boycott : सिनेमा चांगला असेल तर काय कराल? बहिष्कार घालणाऱ्यांना करीनाचा सवाल