एक्स्प्लोर

Magic Upcoming Marathi Movie: 'मॅजिक' एक मायाजाल; एन्काऊंटर स्पेशलिस्टच्या भूमिकेत झळकणार जितेंद्र जोशी, कोडं सुटणार?

Magic Upcoming Marathi Movie: तुतारी व्हेंचर्स या निर्मिती संस्थेच्या राजू सत्यम यांनी 'मॅजिक' या सिनेमाची निर्मिती केली आहे. 'आई कुठे काय करते'सारख्या उत्तमोत्तम मालिकांचं दिग्दर्शन केलेल्या रवींद्र विजया करमरकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Magic Upcoming Marathi Movie: आजवर अनेक भूमिकांतून आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर आता अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) नव्या वर्षात 'मॅजिक' करणार आहे. मॅजिक या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटात (Psychological Thriller Film) जितेंद्र जोशी एन्काऊंटर स्पेशलिस्टच्या भूमिकेत असून, 1 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलंय.            

तुतारी व्हेंचर्स या निर्मिती संस्थेच्या राजू सत्यम यांनी 'मॅजिक' या सिनेमाची निर्मिती केली आहे. 'आई कुठे काय करते'सारख्या उत्तमोत्तम मालिकांचं दिग्दर्शन केलेल्या रवींद्र विजया करमरकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. योगेश विनायक जोशी, रवींद्र विजया करमरकर यांनी कथालेखन, तर योगेश विनायक जोशी, अभिषेक देशमुख यांनी पटकथा लेखन केलं आहे. केदार फडके यांनी छायांकन तर मंदार चोळकर वैभव जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना देवेंद्र भोमे, चिनार-महेश यांनी संगीत दिले आहे. दिनेश पुजारी, नयनेश डिंगणकर यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात जितेंद्र जोशी, सिद्धीरुपा करमरकर, जुई भागवत, प्रियांका पालकर, मयूर खांडगे, अभिजित झुंजारराव, रुपा मांगले, नितीन भजन, गुरुराज कुलकर्णी, योगेश केळकर, प्रदीप डोईफोडे, रसिकराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट अनेक महोत्सवांमध्ये गौरवला गेला आहे.                                                                                                                                

'मॅजिक' या चित्रपटात अरूण राऊत या एन्काऊंटर स्पेशलिस्ट असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची गोष्ट उलगडण्यात आली आहे. सायकोलॉजिकल थ्रिलर असलेल्या या 'मॅजिक' चित्रपटाची गोष्ट नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. आजवर अनके फेस्टिवलमध्ये या चित्रपटानं आपली वेगळी मोहोर उमटवली असून उत्तम स्टारकास्ट, रंजक कथानक असलेला 'मॅजिक' चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी 1 जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

सिनेमाच्या इतिहासात मोठी एन्ट्री! V. Shantaram बायोपिकसाठी निवडला ‘हा’ अभिनेता… पोस्टर पाहून चाहते भारावले

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
Govinda Sunita Divorce: गोविंदा दुसऱ्या लग्न करण्याच्या तयारीत? नेमकं खरं काय? सुनीताच्या आरोपांवर Hero No. 1च्या मॅनेजरचा खुलासा...
गोविंदा दुसऱ्या लग्न करण्याच्या तयारीत? नेमकं खरं काय? सुनीताच्या आरोपांवर Hero No. 1च्या मॅनेजरचा खुलासा...
Tukaram Mundhe Biopic: IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Embed widget