एक्स्प्लोर

जिया खानच्या आईचे सलमान खानवर गंभीर आरोप, इन्स्टावर व्हिडीओ केला शेअर

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. दिग्दर्शक अभिनव कश्यपनंतर आता दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या (Jiah Khan) आईने राबिया खान यांनी सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई :अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर चर्चा सुरु आहे. दिग्दर्शक अभिनव कश्यपसह अनेक चाहत्यांनी सलमान खानवर आरोप केले आहेत. यानंतर आता अभिनेत्री जिया खानच्या आईने देखील सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्री जिया खाननं 2013 मध्ये आत्महत्या केली होती. आता सुशांतच्या आत्महत्येनंतर जियाची आई राबिया अमीन यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत सलमान खानवर आरोप केले आहेत. या व्हिडीओमध्ये राबिया यांनी म्हटलं आहे की, 'माझ्या संवेदना सुशांत सिंहच्या कुटुंबासोबत आहेत. हे हृदय पिळवटून टाकणारं असतं. ही काही मस्करीची गोष्ट नाही. बॉलिवूडला बदलावं लागेल. बॉलिवूडला जाग आली पाहिजे. एखाद्याची टर उडवणं पूर्णपणे बंद करावं. कारण थट्टा उडवणं ही एक प्रकारची हत्या करण्यासारखं आहे.'
View this post on Instagram
 

Late Actress Jiah Khan's Mother From London On NEPOTISM In Bollywood Issue ???? . . . #sushantsinghrajput #jiahkhan #salmankhan #ripsushantsinghrajput #suicide #mentalhealth #nepotism #bollywoodmovies #bollywood #jiahkhansuicide

A post shared by Scuttlebutt (@bollywood.scuttlebutt) on

राबिया यांनी आरोप केला आहे की, 'जे काही होत आहे त्याने मला 2015 ची आठवण करून दिली. जियाच्या आत्महत्येनंतर सीबीआय अधिकाऱ्यांना काही पुरावे मिळाले होते. यासंबंधी त्यांनी मला लंडनहून भारतात भेटायला बोलावलं होतं. मी त्यांना भेटले तेव्हा ते म्हणाले की, सलमान खानचा फोन आला होता. तो दररोज फोन करतो आणि पैशांबद्दल बोलतो. तो अधिकाऱ्यांना सांगतो की मुलाला काही विचारू नका, त्याला हात लावू नका, त्याची चौकशी करू नका. मग आम्ही काय करू शकतो.' राबिया यांनी म्हटलं की, तो अधिकारीही या सर्व गोष्टींमुळे त्रासलेला आणि नाराज दिसत होता. मग मी ही गोष्ट दिल्लीतील उच्चाधिकाऱ्यांपर्यंत नेली. मी याबद्दल तक्रारही केली.  मी सर्वांना सांगू इच्छिते की, या विरोधात उभे रहा, आंदोलन करा, लढा आणि बॉलिवूडमधील या वागणूकीला वेळीच थांबवा, असं देखील राबिया यांनी म्हटलं आहे. हेही वाचा- अभिनव कश्यपने देखील केला होता सलमान खान आरोप सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेकांनी बॉलिवूडमधील घराण्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अनुराग कश्यपचा भाऊ आणि दबंगचा दिग्दर्शक अभिनव कश्यपने फेसबुकवर पोस्ट लिहून बॉलिवूड कंपूवर टीका केली होती. त्याचा सगळा रोख सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियावर होता. सलमान खानमुळे काम मिळणं बंद झाल्याचा आरोप त्याने केला आहे. दबंग तुफान हिट झाल्यावर अभिनव दंबग- 2 चं देखील दिग्दर्शन करणार होता. पण काही कारणाने त्याने नकार दिला होता. अभिनवने सलमान खान आणि त्याच्या कुटुबियांवर गंभीर आरोप केले आहेत. दबंग सिनेमाच्या रिलीजनंतर सलमान खानने सोहेल खान आणि अरबाज खान यांच्यासोबत मिळून 'बेशरम' सिनेमा रिलीज होणे थांबवण्यापासून ते सिनेमाचे राईट्सबाबतची अनेक अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न  केल्या, असं अभिनवने म्हटलं होतं. अभिनवने लिहिलं होतं की, माझा अनुभव या सर्व गोष्टींपेक्षा वेगळा नाही. मलाही शोषणाचा सामना करावा लागला आहे. दहा वर्षांपूर्वी दबंग 2 मधून मी बाहेर पडण्याचे कारण म्हणजे अरबाज खान आणि सोहेल खान यांनी माझ्या कारकिर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी खूप घाबरलो. अरबाजने खाने माझा श्री अष्टाविनायक फिल्म्समधील दुसरा प्रोजेक्टमध्ये अडथळे निर्माण केले. माझा कारकिर्दिवर मोठा परिणाम होण्याची धमकीही मला देण्यात आली. त्यानंतर मी श्री अष्टाविनायक फिल्म्सला पैसे परत दिले आणि त्यानंतर मी व्हायकॉम पिक्चर्सकडे गेलो. तिथेही तोच अनुभव आला. त्यानंतर रिलायन्स एंटरटेनमेंट मला वाचवण्यासाठी पुढे आली आणि आम्ही भागीदारीत 'बेशरम' चित्रपटावर काम केले, असं अभिनवनं फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoor Eetha Trailer Release: 'महाराष्ट्राची शान, लावणीचा अभिमान... विठाबाई...'; अंगावर शहारे आणणारा श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर, दमदार डायलॉग्स अन् म्युझिक, Trailer
'महाराष्ट्राची शान, लावणीचा अभिमान... विठाबाई...'; अंगावर शहारे आणणारा श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर, दमदार डायलॉग्स अन् म्युझिक, Trailer
Veen Doghantli Hi Tutena Samar Swananadi Pregnant: 'आपल्याला बाळ होणार...', समर-स्वानंदीच्या आयुष्यात गोड पाहुण्याची चाहुल? 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत अनोखं वळण, VIDEO
'आपल्याला बाळ होणार...', समर-स्वानंदीच्या आयुष्यात गोड पाहुण्याची चाहुल? 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत अनोखं वळण, VIDEO
Rakul Preet Singh On Surpanakha Character Ramayana Movie: 'शूर्पणखाबद्दल अनेक गैरसमज... तिच्यामुळेच युद्धाची सुरुवात झाली...'; 'रामायण' सिनेमातल्या भूमिकेवर रकुल प्रीत सिंह थेट वक्तव्य, काय म्हणाली?
'शूर्पणखाबद्दल अनेक गैरसमज...'; 'रामायण' सिनेमातल्या भूमिकेवर रकुल प्रीत सिंह थेट वक्तव्य, काय म्हणाली?
Vandana Gupte Video On Aamne Samane Natak Controversy: आपण आर्टिस्ट, कोणी अपमान केलेला तुला सहन होईल का? आमने-सामने नाटकाच्या वादानंतर वंदना गुप्तेंचा लीना भागवत-मंगेश कदमांना प्रेमळ दम, म्हणाल्या...
आपण आर्टिस्ट, कोणी अपमान केलेला तुला सहन होईल का? आमने-सामने नाटकाच्या वादानंतर वंदना गुप्तेंचा लीना भागवत-मंगेश कदमांना प्रेमळ दम, म्हणाल्या...

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra MLC Election : शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
Supreme Court: 'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Narendra Modi :  अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
Pune Solapur Highway Accident: महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
Gold Silver Rate Crash : सोने दर उच्चांकावरुन 51000 रुपयांनी घसरले, IBJA नं जारी केलेले 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने 1364 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6678 रुपयांनी घसरले, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Gokul Election: महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
Washim Farmer Protest: वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Embed widget