जान्हवी कपूरचं मराठीत धडाकेबाज भाषण, राम कदमांकडून कौतुकाचा वर्षाव, पाहा VIDEO
Janhvi Kapoor Marathi Speech : जान्हवी कपूरचं मराठीत धडाकेबाज भाषण, राम कदमांकडून कौतुकाचा वर्षाव, पाहा VIDEO

Janhvi Kapoor Marathi Speech : भारतात शनिवारी (दि.17) दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, मुंबईतील दहिहंडी उत्सव नेहमीप्रमाणे याही वर्षी चर्चेचा विषय ठरला. मुंबईतील दहिहंडी उत्सवासाठी अनेक नृत्यांगणांचे डान्स कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नृत्यांगणा गौतमी पाटीलचा डान्स पाहाण्यासाठी मागाठाणे येथे लोकांनी तुफान गर्दी केली होती. दरम्यान, घाटकोपर येथे आमदार राम कदम यांच्याकडून दहिहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. राम कदम यांच्या दहिहंडी उत्सव कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor Marathi Speech) हिने हजेरी लावलेली पाहायला मिळाली. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. (Janhvi Kapoor Marathi Speech)
दरम्यान, यावेळी बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिने मराठीत धडाकेबाज भाषण केलेलं पाहायला मिळालं. त्यानंतर जान्हवीचं मराठी ऐकून राम कदम यांनी तिच्या मराठी बोलण्याचं कौतुक केलं. सध्या जान्हवी कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. लोकांनी या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. (Janhvi Kapoor Marathi Speech)
*जान्हवी कपूरचं मराठीत धडाकेबाज भाषण, राम कदमांकडून कौतुकाचा वर्षाव, पाहा VIDEO* pic.twitter.com/Nff4dIYeNA
— Sumit Bhujbal (@SumitBhujb19648) August 17, 2025
जान्हवी कपूर म्हणाली, "नमस्कार घाटकोपर... सर्वप्रथम सर्वांना दहिहंडीच्या खूप खूप शुभेच्छा.. येत्या 29 ऑगस्टला माझा परमसुंदरी हा सिनेमा रिलीज होतो आहे. तुम्ही सर्वांनी तो सिनेमा आवर्जुन पाहावा.. तुम्हाला तो सिनेमा नक्की आवडेल. मला इथे बोलवल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानते. जय हिंदी जय महाराष्ट्र...!"
View this post on Instagram
जान्हवी कपूर या बॉलिवूडमधील उत्तम अभिनेत्रींमध्ये एक मानली जात. खूपच कमी वेळात त्यांनी चित्रपटसृष्टीत मोठं नाव कमावलं आहे. जान्हवीने 2018 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आणि काही वर्षांतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी असलेल्या जान्हवीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीये.
अभिनेत्रीचा जान्हवी कपूरचा जन्म 6 मार्च 1997 रोजी मुंबईत झाला. तिने ‘धडक’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं आणि लवकरच ती टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाऊ लागली. आज ती कोट्यवधींची मालकिण आहे. फक्त काही वर्षांतच तिने स्वतःच्या मेहनतीवर कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. तिची जास्तीत जास्त कमाई चित्रपटांमधूनच होते. रिपोर्ट्सनुसार, जान्हवी 58 कोटींची संपत्ती आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Sholay सिनेमातून सचिन पिळगावकरांचा गब्बरसोबतचा 'तो' सीन हटवला होता, 50 वर्षांनी कारण समोर!























