एक्स्प्लोर

3 मिनिटे 7 सेकंदांचा अंगावर काटा आणणाऱ्या 'इंद्रजाल' ट्रेलरचा धुमाकूळ; रहस्य, सस्पेन्स अन् धक्कादायक ट्विस्ट!

प्रत्येक दृश्यामागे दडलेले रहस्य, कथानकातील अनपेक्षित वळणे आणि पात्रांभोवती निर्माण होणारे गूढ वातावरण यामुळे हा चित्रपट एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव देणार असल्याचे स्पष्ट होते.

Indrajaal: रहस्य, सस्पेन्स आणि उत्कंठेचा अनोखा मिलाफ असलेला आगामी हिंदी चित्रपट ‘इंद्रजाल'चा बहुप्रतीक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, सोशल मीडियावर त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलरमधील वेधक कथा, प्रभावी संवाद, दमदार पार्श्वसंगीत आणि उत्कंठावर्धक दृश्यरचना यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. 'इंद्रजाल'चा ट्रेलर सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. प्रत्येक दृश्यामागे दडलेले रहस्य, कथानकातील अनपेक्षित वळणे आणि पात्रांभोवती निर्माण होणारे गूढ वातावरण यामुळे हा चित्रपट एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव देणार असल्याचे स्पष्ट होते.

चित्रपटाची निर्मिती भव्य स्वरूपात करण्यात आली असून, तांत्रिकदृष्ट्याही 'इंद्रजाल' सरस ठरण्याची चिन्हे ट्रेलरमधून दिसून येतात. कलाकारांचा प्रभावी अभिनय, उत्कृष्ट छायांकन आणि पार्श्वसंगीतामुळे ट्रेलर अधिक प्रभावी बनला आहे. साधारण ३ मिनिटांचा हा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांनी त्याचे कौतुक करत चित्रपटाबद्दलची उत्सुकता व्यक्त केली आहे. रहस्यप्रधान चित्रपटांच्या चाहत्यांसाठी 'इंद्रजाल' ही एक खास पर्वणी ठरणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे.

 

'इंद्रजाल' या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि संकलन दिग्दर्शक जागेश्वर ललिता ढोबळे यांनी केले आहे. तर निर्मितीची धुरा निर्माती सुचेता अजय निकम यांनी पेलवली आहे. तर सहनिर्माते अजय शिवराम निकम आणि मंगेश शालीग्राम वैती आहेत. चित्रपटाचे लेखन लेखक नामदेव मुरकुटे यांनी केले आहे. तर संपूर्ण चित्रपट आकाश सेठी याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. चित्रपटातील दमदार गाणी गायिका सुवर्णा तिवारी आणि गायक गौरव चाटी यांनी आपल्या प्रभावी आवाजाने स्वरबद्ध केली आहेत. गाण्याच्या संगीताची धुरा गौरव चाटी यांनी उत्तमरित्या पेलवली आहे. तसेच गाण्याची आशयघन शब्दरचना योगेश दांगट यांनी केली आहे. संगीत संयोजन, प्रोग्रामिंग आणि बैकग्राउंड स्कोरची जबाबदारी ऊदय साळवी यांनी सांभाळण्यात कोणतीही कसर सोडली नाही. गाण्याचे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून हरेश सुतार यांनी बाजू सांभाळली.

चित्रपटात महेश निकम, शनाया त्रिपाठी, यशराज डिंबळे, नामदेव मुरकुटे, किरण माने, कल्पना सारंग, दर्शना रासाळ, धीरज शर्मा, सत्यम छेत्री, राहुल कुलकर्णी, जीवन वाघ, कल्पेश जगताप, योगेश दांगट, हेमंत पवार, शुभम चव्हाण, लक्ष्मी विभूते, संजना देशमुख, राहुल निकम, प्रतिक्षा सादाकाळे, दीपक देशमुख, वज्र पवार, मल्हार गुरव, अथर्व गाडे, कीर्ती बोडस, अजिम पटेल, ओंकार राऊत आणि विजय इंगळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

२४ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘इंद्रजाल' या चित्रपटाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असून, त्याचा ट्रेलर प्रेक्षकांसाठी एक भव्य सिनेमॅटिक अनुभव ठरत आहे. आता ट्रेलरनंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली असून, 'इंद्रजाल' मोठ्या पडद्यावर कोणते रहस्य उलगडणार, याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shriram Nene on Madhuri Dixit:बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
Kranti Redkar On Sameer Wankhede: 'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
Samay Raina Tanzania Boy Sing Marathi song: टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
Embed widget